Posts

Showing posts from April, 2025
Image
  महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन रायगड :  प्रतिनिधी  :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल,  गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक,  अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला. जिल्हा व राज्य...
Image
 इंडो स्काॅट्स ग्लोबल स्कूल तर्फे आरोग्य जनजागृती ठाणे! मुलुंड : सतिश पाटील :- इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या वतीने तलावपाळी येथे आरोग्य जनजागृतीसाठी वॉकाथॉन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वास्थ्याची जाणीव निर्माण करणे आणि स्थूल जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा होता. शाळेच्या प्राचार्या डॉ. निकिता व्ही. कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सर्व सहभागींसाठी वॉकानंतर सौम्य वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. डॉ. अपर्णा चव्हाण (कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट) यांनी श्वसन आरोग्य व हृदयाचे आरोग्य कसे जपावे यावर मार्गदर्शन केले. सुप्रिया केदार (पॅथॉलॉजिस्ट) यांनी नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व स्पष्ट केले. अनुराधा जोशी (न्युट्रिशनिस्ट व फार्मासिस्ट) यांनी संतुलित आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात पालक व व...
Image
  सामान्य जनतेला सेवेचा अधिकार मिळवून देणारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम   जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड : प्रतिनिधी :- राज्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा या ठरावीक मुदतीत मिळवण्याचा हक्क मिळवून देणारा कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ दशकपूर्ती आणि प्रथम  'सेवा हक्क दिन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, डॉ. रविंद्र शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक सेवा देणाऱ्या अधिकारी व कार्यालयाचा गौरव करण्यात आला. महसूल विभागाने या अंतर्गत सर्वाधिक ...
Image
 नागोठणे येथे पोलिसांना लागलीय भीक? मटका जुगाराच्या हप्त्यांवर चालतोय पोलिसांचा उदरनिर्वाह?  नागोठण्यात सलाम मटका आणि वाकण नाक्यावर बोंबाट्या मटका  राजरोसपणे सुरू, पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना लाखोंचा हप्ता?  रायगड : विशेष प्रतिनिधी :- नागोठणे येथे पोलीस स्टेशनचे हद्दी मार्केटमध्ये सलाम याचे सात ते आठ मटक्याचे अवैध धंदे तसेच वाकण नाक्यावर बोंबाट्या याचे दोन मटकेची धंदे सुरू असून या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करण्यास का घाबरतात? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. येथील पोलिसांना भीक लागलीय काय? येथून हप्ता घेऊन पोलिसांचा उदरनिर्वाह चालतो का? असे संतप्त सवाल या परिसरातून नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे मटका जुगार चालकांकडून येथील पोलिसांना मजबूत हप्ता चालू असल्याचे बोलले जात आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.  नागोठणे पोलिसांच्या आशीर्वादामुळे हा बेकायदा मटका जुगार चालू असून. येथे सुरू असलेल्या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे. तरी या अवैध धंद्यांविरुद्ध रायगडचे पोलीस...
Image
  कर्जत प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प नाही; नागरिकांमध्ये तीव्र संताप,  पुरवठा व पेन्शन विभाग तळमजल्यावर हलवा, माऊली फाऊंडेशन ची आग्रही मागणी पत्रकार : पंकेश जाधव :- कर्जत : कर्जत येथील प्रशासन भवनात अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्यास सोयीस्कर रॅम्पची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासन भवनात येणाऱ्या वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, तसेच पुरवठा व पेन्शनसंबंधी कामांसाठी भवनात येणाऱ्या नागरिकांना जिना चढणे-उतरणे मोठ्या त्रासाचे ठरत आहे. शासकीय कार्यालये ही सर्वसामान्य नागरिकांसाठी सहज पोहोचण्याजोगी असावी, अशी सामान्य अपेक्षा असते. मात्र प्रशासन भवनात रॅम्प नसल्याने अपंग व ज्येष्ठ नागरिकांना शासकीय सेवा मिळविणेच अवघड झाले आहे. काही नागरिकांना तर दुसऱ्याच्या मदतीशिवाय वर जाणे शक्यच राहत नाही. त्यामुळे त्यांना अपमानास्पद व त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. या समस्येकडे प्रशासनाने वारंवार लक्ष वेधूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र ...
Image
  शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे : प्रतिनिधी :- आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन देऊ शकतो. यासाठी 'पुणे अर्बन डायलॉग' सारखे मंथन आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशदा, बर्वे चॅरिटेबल ट्रस्ट, इंटरनॅशनल सेंटर आणि पुणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे आयोजित 'पुणे अर्बन डायलॉग-आव्हाने आणि उपाय' कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, विजय शिवतारे, बापुसाहेब पठारे, हेमंत रासने, माजी मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, पिंपरी ...
Image
  सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना गडचिरोली : प्रतिनिधी : - नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याची जागृती जिल्ह्यात वाढण्यासाठी येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ निमित्ताने विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.  राज्य शासनाने 28 एप्रिल 2015 पासून लागू केलेल्या लोकसेवा हक्क कायद्याचे उद्दिष्ट नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित सेवा प्रदान करणे आहे. हा कायदा शासकीय विभागांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. यंदा या कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला सेवा हक्क दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षेत्रात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम:  सेव...
Image
  जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी 'सेवा हक्क दिन' कार्यक्रमाचे आयोज रायगड : प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार दि. २८ एप्रिल  रोजी दु.१२ वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग येथे 'सेवा हक्क दिन' साजरा करण्यात येणार आहे.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री कु. अदिती तटकरे आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा हक्कांबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
Image
  पनवेल महानगर पालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून निश्चितच  गुणवत्ताधारक खेळाडू घडतील :           - माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार  महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न रायगड : प्रतिनिधी :- पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था पाहिल्यावर छातीठोकपणे सांगू शकतो की, ही सर्व व्यवस्था एक नंबर आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर या  रत्नपारखी व्यक्तिमत्त्वाची  निवड अगदी अचूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच  घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री  आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला. पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन आज रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते. या वेळी भा...
Image
  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याकडून जिल्हा परिषद शाळांची तपासणी; मूलभूत सुविधा व सुरक्षा उपायांची पाहणी गडचिरोली : प्रतिनिधी :- जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीच्या तपासणी अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेटी देत शाळांमधील मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी शौचालयांची उपलब्धता, जेवणासाठी उभारण्यात आलेल्या शेड्सची स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळा काटली,  नगरी व वसाचक आदी शाळांना भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्याकडून शाळेतील सुविधा व अडचणी जाणून घेतल्या. या दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक. एम. रमेश, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, बाबासाहेब पवार प्रामुख्याने उपस्थित होते. मूलभूत सुविधा व दुरुस्तीबाबत निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी सर्व शाळांमध्ये जेवणासाठी आवश्यक शेड्स पुढील एक वर्षात उभारण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. यासोबतच स्वयंपाकाचे शेड अद्...
Image
  लातूर जिल्ह्यात अमृतधारा अभियानांतर्गत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ लातूर : प्रतिनिधी : - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यात सुरू झालेल्या अमृतधारा अभियानांतर्गत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ आज लातूर तालुक्यातील मळवटी येथे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते झाला.  या प्रसंगी तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, सरपंच गोविंद गरड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार पाटील, कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाचे कर्मचारी, महिला बचत गटाच्या सदस्या आणि शेतकरी उपस्थित होते. मळवटी येथील शेतकरी किशोर पाटील यांच्या शेतात लोकसहभागातून जलतारा प्रकल्पांतर्गत तीन खड्डे खणून त्यात दगड भरण्यात आले. उपविभागीय अधिकारी श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी शेतकऱ्यांना जलतारा प्रकल्पाचे महत्त्व, त्यामुळे होणारे फायदे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) हा प्रकल्प कसा राबवता येईल, याची माहिती दिली. त्यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शेतकऱ...
Image
  सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न   ठाणे : प्रतिनिधी :- आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज येथे केले. सध्याच्या जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौ...
Image
  ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर  करण्याचे आवाहन पुणे : प्रतिनिधी  :-  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशासन लोकाभिमुख आणि गतिशील करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 'यशदा' येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे आयोजित पंचायत राज राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे मह...
Image
  नवीमुंबई (गोठीवली) पहीली एम.डी.डॉक्टर  मुलुंड : सतिश पाटील :- नवीमुंबई (गोठवली) गावातील पहीली एम.डी.डॉक्टर तेजल पाटील हिने अथक मेहनत व परिश्रम घेऊन एम.डी.ड्रीग्री मिळवली.विशेष म्हणजे लग्न झाल्यावर बाईला चूल मुल हे समीकरण असते.आणि खरंच प्रपंचात पडल्यावर खूप  जिम्मेदारी असते एक आपण आपले माहेर सोडून सासरी गेलेलो असतो नवीन घर नवीन माणसं पण तसं न होता सासू,सासरे ,नवरा यांनी पुढील शिक्षणात मदत केली व मेहनतीला यश आले.तेजल यांचे प्राथमिक शिक्षण ऐरोली येथील सेंट झेवियर्स स्कूल मधून झाले.पुढे नाशिक येथील सप्तशृंगी वैद्यकीय महाविद्यालयातून बीए.एम.एस. (एमडी) ची पदवी संपादन केली .या तीच्या कार्याचे कौतुक सर्व स्थरांतून होत आहे .इच्छाशक्ती व मेहनत याच्या बळावर आपण निश्चित   यशवंत होतो हे आजच्या पिढीला एक चांगला मेसेज समाजात जात आहे .अभिनंदन डाॅ.तेजल पाटील .
Image
  ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्वपूर्ण योगदान द्यावे- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला सुरुवात पुणे : प्रतिनिधी :-    ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक असून ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.  ग्रामविकास विभागाच्यावतीने यशदा येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला सुरुवात झाली.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक उपस्थित होते. मंत्री श्री. गोरे म्हणाले, विचारांची देवाणघेवाण करुन चर्चेतून प्रचंड वेगाने प्रशासन प्रगतीपथावर गेले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. ...
Image
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पुणे : प्रतिनिधी :- पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी  श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे,  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस ...
Image
 
Image
  जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यात १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात लोकसहभागातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ १ मे रोजी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा व बैठक  घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाईल. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात येईल.‌ १ मे ते १० मे या कालावधीत गावातून संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मिती नंतर १५...
Image
  सिर्फ दिल, बिना बिल डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण रायगड : प्रतिनिधी : - आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश  शेटे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा प्रारंभ गडचिरोलीपासून करत नवी मुंबईतील विविध महत्त्वाच्या रुग्णालयांना (दि.२३एप्रिल)  भेटी दिल्या. एमजीएम हॉस्पिटल (कामोठे), क्रिटी केअर (कामोठे), आशा हॉस्पिटल (कळंबोली), मिलेनियम हॉस्पिटल (उलवे) आणि सत्य साई संजीवनी बाल रुग्णालय (खारघर) या ठिकाणी त्यांनी आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या मोफत सेवा प्रत्यक्ष पाहिल्या. डॉ. शेटे यांनी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या रुग्णालयांचे कौतुक करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे विशेष अभिनंदन केले. त्याच वेळी, सेवा गुणवत्तेत त्रुटी आढळलेल्या संस्थांवर तात्काळ कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले. खारघरमधील सत्य साई संजीवनी बाल रुग्णालयातील सेवाभावाने डॉ. शेटे भारावून गेले. हे महाराष्ट्रातील एकमेव बाल रुग्णालय आहे जेथे हृदयविकारग्रस्त बालकांसाठी "नो बिल काउंटर"च्या माध्यमातून सं...
Image
  जिल्ह्यातील मनरेगाची कामे प्राधान्याने पूर्ण करा        मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड रायगड : प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मनरेगाच्या कामांकरिता केंद्र व राज्य शासनाकडून निधीची उपलब्धतता करुन दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत सुरु असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित मनरेगाच्या कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं.राजेंद्र भालेराव, उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांसह जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी  मनरेगा आयुक्त डॉ.भरत बास्टेवाड म्हणाले की, मनरेगा अंतर्गत मागील वर्षातील काही कामे प्रलंबित असतील तर ती तातडीने पूर्ण करावीत जेणेकरुन पुढील नवीन कामांकरिता निधीची मागणी करण्याकरिता अडचण भासणार नाही.  तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधारसिडींगची कामे शंभर टक्के पूर्ण करावीत.  मनरेगा...
Image
  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा रायगड : प्रतिनिधी :- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त जिल्ह्यातील सात खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज घोषणा केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मनिषा पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथ.) श्रीमती पुनिता गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत वाघ आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की,  धैर्य, शौर्य, संयम, प्रयत्न हे या रायगडच्या मातीचे गुण आहेत. या जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी सात खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे. या सर्व खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे आणि राज्याचे नव्हे तर देशाचा नाव लौकिक वाढविला पाहिजे. त्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करीत आहे. तसेच वेळोवेळी धोरणत्मक निर्णय घेते. त्याचा सर्वा...
Image
  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी   सातारा : प्रतिनिधी : - लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यावर हेलीकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही पुष्पहार अपर्ण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन केले.  मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.  पुष्पवृष्टी झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पोलीस बॅन्ड पथकाने मानवंदना दिली.  यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्वप्नातील पाटण घडविण्यासाठी कटीबद्ध आहे. त्यांनी सर्वसमान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून पाटण तालुक्याचा विकास केला. त्यांनी घालून दिलेल्या विचारांवरच मी काम करित आहे. पाटणच्या सर्वांगीण ...
Image
  महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा सातारा : प्रतिनिधी :-  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच 'महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५' मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव २ ते ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या पर्यटन महोत्सवाच्या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.  या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या क्षमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पाट...
Image
  कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक बियाणे, खतांच्या विक्री, व्यवहारात पारदर्शकता ठेवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार अकोला : प्रतिनिधी :- खरीपासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. त्यासाठी दर, साठा आदी सर्व बाबींचे सुस्पष्ट फलक, उन्हाळा लक्षात घेऊन विक्री केंद्रांवर सावली, पेयजल आदी सुविधा असाव्यात. भरारी पथकांनी कठोर निगराणी ठेवावी. शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले. जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे,   कृषी विकास अधिकारी महेंद्र साल्के यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, कृषी निविष्ठांची सार्वत्रिक मुबलक उपलब्धता असावी. त्याचप्रमाणे, कुठेही चढ्या दराने विक्री, साठेबाजी हो...
Image
 
Image
 
Image
 
Image
  महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न  ठाणे : प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिनानिमित्त दि.1 मे 2025 रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात करावयाच्या कामांबाबत उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, स्काऊट व गाईड आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा संघटक हेमांगी पाटील, ठाणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी देवदत्त शिंदे, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व विभागांनी त्यांना नेमून दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला दिली.
Image
  महाराष्ट्र रत्न अनिल जाधव यांच्या प्रथम पुण्यतिथी त्याना भावपुर्ण श्रद्धांजली रायगड : कैलास जंगम :- आज समाजातील एक अत्यंत प्रेरणादायक आणि समर्पित व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल मधुकर जाधव यांच्या प्रथम पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवशी त्यांना स्मरण करत त्यांच्या कार्याची आठवण करणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समाजासाठी समर्पित होता, आणि त्यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. श्री. अनिल जाधव यांनी आपल्या जीवनाची दिशा समाजसेवेसाठी ठरवली होती. त्यांचे कार्य केवळ शालेय आणि शैक्षणिक क्षेत्रातच मर्यादित नव्हते, तर त्यांनी आपल्याला सामाजिक सुधारणा, आरोग्य, पर्यावरण रक्षण, आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मदतीसाठी एक अनमोल उदाहरण दिले. त्यांच्या कार्यामुळेच अनेक लोकांनी समाजसेवेत प्रवेश केला आणि त्यांचा आदर्श जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रुंदावला. श्री. अनिल जाधव यांचे योगदान केवळ कार्यात नव्हे, तर लोकांच्या जीवनातील बदलांमध्ये देखील दिसून आले. त्यांच्या प्रयत्नांनी अनेक जनसमूहांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवले. ते केवळ समस्यांना सोड...
Image
  दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर रायगड : प्रतिनिधी :- ग्रामीण रोजगार व कौशल्य विकासास चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेचे (DDU-GKY) सुधारित रूप डीडीयू-जीकेवाय 2.0 सुरू केले आहे. या योजनेच्या अंमल बजावणीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहॆ.  ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने नुकताच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री. अबू ओ. सैफी यांनी महाराष्ट्र राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यात राज्यातील विविध प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन केले.  श्री. सैफी यांनी पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील RUDSET प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली. प्रशिक्षणार्थी आणि प्रकल्प अंमलबजावणी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची माहिती घेतली. प्रशिक्षण केंद्राच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी ग्रामीण युवकांसाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे महत्व अधोरेखित केले. तथ...
Image
  पालेखुर्द गावाच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा ! कुणबी समाजाचे नेते महेशदादा ठाकुर यांची भाजप रोहा तालुका अध्यक्षपदी (पेण विधानसभा) निवड  कोलाड : विशेष प्रतिनिधी :-  पालेखुर्द सुपुत्र,पालेखुर्द गावाचे आधारस्तंभ गेली 18 वर्ष सक्रिय समाजकारण, राजकारण राहून गोरगरीब जनतेची सेवा करणारे श्री महेशदादा ठाकुर यांची भारतीय जनता पार्टी च्या रोहा तालुका अध्यक्षपदी निवड झाली  रोहा तालुका अध्यक्ष (नागोठणे मंडळ पेण विधानसभा )पदावर निवड झाली.पक्षाने एका कुणबी समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला रोहा तालुका अध्यक्ष (नागोठणे मंडळ पेण विधानसभा )पदी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब,कार्यकारी अध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण साहेब,दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष,खासदार श्री धैर्यशीलदादा पाटील साहेब, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री सतीशजी धारप साहेब,आमदार  रवीशेठ पाटील साहेब ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील साहेब  यांनी योग्य व्यक्तीची निवड केले आहे  रोहा तालुक्यातील नागोठणे व आंबेवाडी जिल्हा परिष...
Image
  सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे  जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन  रायगड : प्रतिनिधी :- एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणीस 10 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या औचित्याने अधिनियमाच्या जनजागृतीसाठी 28 एप्रिल हा दिवस जिल्हा व ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन सेवा हक्क दिन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शनी मोरे, जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त अमिता पवार, तहसिलदार शितल रसाळ, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी निलेश लांडगे तसेच जिल्हाधिकारी शासकीय विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, राज्यातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा पारदर्शक गतीमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरिता 28 एप्रिल 2015 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 अंमलात आला आहे. या अधिनियमांतर्गत 969 सेवा अधिसूचित करण्यात आल्या असून त्यापैकी...
Image
  सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते  'मु. पो. तालकटोरा' पुस्तकाचे प्रकाशन पुणे : प्रतिनिधी :- ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार व अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची संमेलनातील भाषणे संग्रही ठेवण्याच्या उद्देशाने जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार संपादित 'मु. पो. तालकटोरा' या पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीता पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद संस्थेचे संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री श्री. भोसले म्हणाले,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मोठे योगदान आहे. यात सातारच्या शाहूपुरी शाखेचा महत्त्वाचा वाटा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीच्या अनेक वर्ष...