पनवेल महानगर पालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून निश्चितच  गुणवत्ताधारक खेळाडू घडतील :

          - माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार 

महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन संपन्न

रायगड : प्रतिनिधी :- पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था पाहिल्यावर छातीठोकपणे सांगू शकतो की, ही सर्व व्यवस्था एक नंबर आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर या  रत्नपारखी व्यक्तिमत्त्वाची  निवड अगदी अचूक केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे गुणवत्ताधारक खेळाडू निश्चितच  घडतील. तसेच पालिकेच्या प्रयत्नांमुळे या खेळाडूंना चांगल्या संधी नक्की मिळतील, असा विश्वास राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री  आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केला.

पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल येथील नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन आज रविवार, २७ एप्रिल २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी ते बोलत होते.

या वेळी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, पद्मश्री दिलीप वेंगसरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे,अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, सिडकोचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog