
सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा गौरव रायगड (राकेश हुले) कर्जत तालुक्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पंकेश मधुकर जाधव यांचा वाढदिवस. सामाजिक न्यायासाठी लढणारे, जनतेच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवणारे आणि आदिवासी, गरीब, महिला, वंचितांसाठी सदैव कार्यरत असलेले डॉ. जाधव यांनी आपल्या निस्वार्थ सेवेतून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ घेऊन त्यांनी शिक्षण घेतानाच सामाजिक कार्यात पाय ठेवला. त्यांचे कार्य हे फक्त कार्यालयीन बैठका किंवा भाषणांपुरते मर्यादित नसून, त्यांनी गावोगाव जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्वतः पुढे सरसावलो. डॉ. जाधव यांनी अनेक गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांचा विशेष भर आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना घरकुल योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, पाणीपुरवठा योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. डॉ. पंकेश जाधव यांनी स्थ...