तळा शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

तळा : नझीर पठाण :- तळा शहरातील रोहीदास वाडीतील एका अल्पवयीन वय वर्षे१०या मुलीवर ३३वर्षे वयाच्या गणेश म.रसाळ रा.सोनसडे या नराधमांनी अत्याचार केल्याची घटना काल दि.१६एप्रील२५रोजी दुपारी १वा.दरम्यान घडली.या बाबत पोलीस सुत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश रसाळ याने पिडीत मुलगी अज्ञात असल्याचे माहीत असून देखील अज्ञान पणाचा फायदा घेऊन पिडीत मुलीच्या गुप्तांगावर हात घालून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून लैंगिक अत्याचार केला सदरची फिर्याद तीची बहिण रिया हिने दिली असून गुन्हा रजिस्टर नंबर १३/२०२५ भा.द.वि.क६४(१)६४(२)आय६५(२)सह बालकांचे लैंगिक अत्याचार अधिनियम२०१२चे कलम ४५(एम)६ प्रमाणे नोंद करण्यात आली असून घडलेला प्रकाराची दखल ताबडतोब घेऊन सहा.पो. निरिक्षक सतीश गवई घेऊन पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी माणगांव सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

हा घडलेला प्रकार अतीशय निंदनीय असून महीलांचा असुरक्षीततेचा प्रश्र ऐरणीवर आला आहे.कायद्याचा धाक राहिलेला नाही.या नराधमावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog