पालेखुर्द गावाच्या शिरपेचात रोवला गेला मानाचा तुरा !
कुणबी समाजाचे नेते महेशदादा ठाकुर यांची भाजप रोहा तालुका अध्यक्षपदी (पेण विधानसभा) निवड
कोलाड : विशेष प्रतिनिधी :- पालेखुर्द सुपुत्र,पालेखुर्द गावाचे आधारस्तंभ गेली 18 वर्ष सक्रिय समाजकारण, राजकारण राहून गोरगरीब जनतेची सेवा करणारे श्री महेशदादा ठाकुर यांची भारतीय जनता पार्टी च्या रोहा तालुका अध्यक्षपदी निवड झाली
रोहा तालुका अध्यक्ष (नागोठणे मंडळ पेण विधानसभा )पदावर निवड झाली.पक्षाने एका कुणबी समाजातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला रोहा तालुका अध्यक्ष (नागोठणे मंडळ पेण विधानसभा )पदी संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब,कार्यकारी अध्यक्ष श्री रविंद्रजी चव्हाण साहेब,दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष,खासदार श्री धैर्यशीलदादा पाटील साहेब, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री सतीशजी धारप साहेब,आमदार रवीशेठ पाटील साहेब ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील साहेब यांनी योग्य व्यक्तीची निवड केले आहे
रोहा तालुक्यातील नागोठणे व आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातील सगळ्या बुथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पक्षाचे विविध सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावागावात,वाडी वस्त्यांवर भाजपा वाढीसाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजना गोरगरीब गरजू लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काम करीत आहेत
रोहा तालुक्यातील भाजप पक्षाच्या माध्यमातून युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष पद गेली 3 वर्ष सांभाळून रोहा तालुका गावोगावी, वाडी वस्त्यावर भाजपचे संघटना बांधणीचे काम केले, पक्षाचे विविध उपक्रम, कार्यक्रम राबविले, विविध आंदोलन सक्रिय सहभाग घेतला.
प्रचंड दांडगा जनसंपर्कातून युवकांची रोहा तालुक्यात संघटना उभी केली, आणी या तरुण तडफदार नेतृत्वाची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली,लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांचे आंबेवाडी जिल्हा परिषद मध्ये गावोगावी प्रचार यंत्रणा राबवून यशस्वी नियोजन केले, विधानसभा निवडणुकीत भाजपचे सन्माननीय आमदार रवीशेठ पाटील साहेब यांना आंबेवाडी मतदार संघात जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार यंत्रणा राबविली पक्ष नेतृत्वाचा आदेश मानून यशस्वी काम आंबेवाडी जिल्हा परिषद मतदार संघात केले या कामाची दखल पक्ष नेतृत्वा घेतली आणी
भाजप संघटन पर्व निमित्ताने भाजप जिल्हा उपाध्यक्ष व रोहा मंडळ निवडणूक अधिकारी श्री वैकुंठ शेठ पाटील यांच्या उपस्थिती मध्ये श्री महेशदादा ठाकुर यांची रोहा तालुका अध्यक्ष (नागोठणे मंडळ पेण विधानसभा ) निवड जाहीर केली
श्री महेशदादा ठाकुर यांच्या तालुका अध्यक्ष निवडीमुळे सर्वसामान्य काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजप पक्ष नक्कीच न्याय देतो हे सिद्ध झाले आहे
निवडीमुळे पालेखुर्द गावसह कोलाड, सुतारवाडी, खांब, नागोठणे विभागात आनंदाचे वातावरण पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तयार झाले आहे.
Comments
Post a Comment