इंडो स्काॅट्स ग्लोबल स्कूल तर्फे आरोग्य जनजागृती ठाणे!
मुलुंड : सतिश पाटील :- इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या वतीने तलावपाळी येथे आरोग्य जनजागृतीसाठी वॉकाथॉन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वास्थ्याची जाणीव निर्माण करणे आणि स्थूल जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा होता.
शाळेच्या प्राचार्या डॉ. निकिता व्ही. कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सर्व सहभागींसाठी वॉकानंतर सौम्य वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली.
डॉ. अपर्णा चव्हाण (कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट) यांनी श्वसन आरोग्य व हृदयाचे आरोग्य कसे जपावे यावर मार्गदर्शन केले.
सुप्रिया केदार (पॅथॉलॉजिस्ट) यांनी नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व स्पष्ट केले.
अनुराधा जोशी (न्युट्रिशनिस्ट व फार्मासिस्ट) यांनी संतुलित आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमात पालक व विद्यार्थ्यांनी मनापासून सहभाग घेतला व आरोग्याबद्दल सजग राहण्याची प्रतिज्ञा केली. डॉ. निकिता कोठारी यांनी उपस्थितांचे आभार मानून सांगितले की, "आजच्या धावपळीच्या जीवनात नियमित व्यायाम व आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या मुलांसोबतच आपले स्वतःचे आरोग्य टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे."
या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबद्दल सकारात्मक संदेश पोहोचवण्यात इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे, यशस्वी ठरले.
Comments
Post a Comment