महाराष्ट्र दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न
ठाणे : प्रतिनिधी :- महाराष्ट्र दिनानिमित्त दि.1 मे 2025 रोजी होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात करावयाच्या कामांबाबत उपजिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आज आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, स्काऊट व गाईड आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा संघटक हेमांगी पाटील, ठाणे जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी देवदत्त शिंदे, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
सर्व विभागांनी त्यांना नेमून दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.पाटील यांनी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला दिली.
Comments
Post a Comment