जिल्ह्यात २८ एप्रिल रोजी 'सेवा हक्क दिन' कार्यक्रमाचे आयोज
रायगड : प्रतिनिधी :- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग याबाबत जनजागृती करण्यासाठी सोमवार दि. २८ एप्रिल रोजी दु.१२ वा. जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग येथे 'सेवा हक्क दिन' साजरा करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण मंत्री कु. अदिती तटकरे आणि रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध लोकप्रतिनिधी व मान्यवर यांची उपस्थिती राहणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा हक्कांबाबत माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment