नागोठणे येथे पोलिसांना लागलीय भीक? मटका जुगाराच्या हप्त्यांवर चालतोय पोलिसांचा उदरनिर्वाह?
नागोठण्यात सलाम मटका आणि वाकण नाक्यावर बोंबाट्या मटका राजरोसपणे सुरू,
पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना लाखोंचा हप्ता?
रायगड : विशेष प्रतिनिधी :- नागोठणे येथे पोलीस स्टेशनचे हद्दी मार्केटमध्ये सलाम याचे सात ते आठ मटक्याचे अवैध धंदे तसेच वाकण नाक्यावर बोंबाट्या याचे दोन मटकेची धंदे सुरू असून या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करण्यास का घाबरतात? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच आहे. येथील पोलिसांना भीक लागलीय काय? येथून हप्ता घेऊन पोलिसांचा उदरनिर्वाह चालतो का? असे संतप्त सवाल या परिसरातून नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे मटका जुगार चालकांकडून येथील पोलिसांना मजबूत हप्ता चालू असल्याचे बोलले जात आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.
नागोठणे पोलिसांच्या आशीर्वादामुळे हा बेकायदा मटका जुगार चालू असून. येथे सुरू असलेल्या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे. तरी या अवैध धंद्यांविरुद्ध रायगडचे पोलीस अधीक्षक, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी या परिसरात जोर धरू लागली आहे. येथील पोलिसांना या जुगाराच्या धंद्यानमार्फत हप्ता सुरू असल्यामुळे या अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याची या परिसरात जोर धरू लागली आहे. या जुगारांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
Comments
Post a Comment