
रोहा तालुक्यात मुसळधार पाऊस कोलाड आंबेवाडी नाक्यावर पूरपरिस्थि.. वाहन चालकाना मार्ग काढताना तारेवरची कसरत,जनजीवन विस्कळीत, कोलाड : राकेश हुले :- रायगड जिल्ह्यात गेली तीन चार दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका, महिसदरा या नद्या तुडूंब दुथडी भरून वाहत असून डोंगर दऱ्यातून वाहणारे नाले देखील धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे भरून वाहत असल्याने, मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरिल मार्गावर तसेच बाजारात पुराचे पाणी शिरल्याने या पावसाचा फटका दुकानदार यांना बसला आहे. काहींच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धो धो मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर चौपदरी करण्याच्या भरावाचा तसेच अर्धवड उड्डाण पुलांचे काम त्याच बरोबर निकृष्ट दर्जाचे केलेले गटारांची कामे याचा मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे.तर कोलाड आंबेवाडी नाक्यावर कै द ग तटकरे चौकात पाणी साचल्याने रोहा कडे येणाऱ्या तसेच मुंबई केक जाणाऱ्या वाहन चालकाना चौकातून वाहने मार्गक्रमण करताना मोठी तारेवरच...