दिवा प्रभाग समितीवर धडक मोर्चा
अनेक दिवसांपासून जनतेच्या समस्यांबाबत थातूरमातूर उत्तरे देऊन वेळकाढू धोरणाच्या विरोधात पन्नास गावातील भूमिपुत्र एकवटले.
मुबंई प्रतिनीधी : सतिश पाटील :- आगरी समाजातील सर्व सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली.सहाय्यक आयुक्तांना तसेच बांधकाम साहाय्यक बांधकाम अधिकार्यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.गेल्या वर्षीसुद्धा निवेदन दिले होते.या वर्षी देखील निवेदन देऊन आधिकारी वर्ग दखल घेत नाहीत त्यामुळे भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केला.जर नागरिकांच्या समस्यां तुम्हाला सोडवता येत नसतील,तर तुम्ही खुर्चीवर बसता कशाला, जनतेच्या टॅक्स मधून तुमचा पगार दिला जातो याचे भान ठेवून काम करा.मंगळवार २६ऑगस्ट२०२५पर्यत नैसर्गिक नाले बिल्डर, विकासक यांनी बंद केले आहेत त्यामुळे दोन वर्ष सतत गावातील लोकांच्या घरात पाणी घुसून आर्थिक नुकसान होत असून ती त्वरित वसूल करून द्यावी या शासनाकडून द्यावी.अन्यथा सर्व बाधीत गावकरी ,भूमिपुत्र प्रभाग समितीला टाळे ठोकणार असा कडक इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सचिव ह.भ.प.संतोष केणे आणि भूमिपुत्रानी दिला .
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.गणेशजी नाईक यांनाही जनता दरबारात ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आले. मा.गणेश नाईक यांनी निवेदनाची दखल घेऊन त्वरित नायब तहसीलदार ठाणे यांना फोन करून ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत व तसेच बिल्डिंग व विकासक यांच्या मनमानी कारभारावर रोष व्यक्त करून बंद केलेले नाले व पाण्याच्या वाटा खुल्या करून पाणी निचरा होईल याची व्यवस्था करण्यात यावी.गणेश नाईक व नायब तहसीलदार पिडीत भागात पंचनामा करण्यासाठी लवकरच येणार असे सांगितले आहे.डायघर, शिळगाव येथील शशीकांत पाटील व अन्य गावकरी कुटुंबासोबत यांना महापुराचे पाणी वाढल्याने टेरेसवर जीव मुठीत धरून उपाशी बसावे लागले होते.पाण्यात सापही तरंगताना दिसत होते त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होले होते.घरातील आर्थिक नुकसान झाले असून त्याची भरपाई देण्याबाबत निवेदन सादर करून ही पाच वर्ष दखल घेत नाही अखेर या वर्षी तीच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने बाधीत परिसरातील जनतेचा रोष वाढत आहे.आता तरी प्रभाग समिती प्रशासन दखल घेऊन योग्य न्याय देणार अशी अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment