शहरात प्रचंड प्रमाणात घाण, कचरा पसरलेला असताना मुख्याधिकारी यांना स्वच्छ खोपोली पुरस्कार मिळालाच कसा ?

नागरिकांना पडला प्रश्न

तळा : नजीर पठाण :- अखंड खोपोलीत रस्त्यांवर, गल्लीबोळांमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना खोपोली शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. पंकज पाटील यांना स्वच्छतेचा पुरस्कार मिळतोच कसा हा गंभीर प्रश्न आहे.

मुख्याधिकाऱ्यांना सदर पुरस्कार देण्याच्या अगोदर शासनाने शहराची पाहणी केली होती का ? कोणत्या नियमांच्या अनुसार सदर पुरस्कार देण्यात आलेला आहे ? शहरात प्रचंड प्रमाणात घाण कचरा आहे अशा नागरिकांच्या प्रचंड तक्रारी येत असताना शहराचे मुख्याधिकारी यांना हा पुरस्कार मिळणे म्हणजे जगातील आठवे आश्चर्य आहे. 

शहरातील सर्व प्रभागांचा दौरा करून प्रत्येक वार्डातील असलेले घाण, कचरा यांचे फोटो व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करणार आहे व खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची पोलखोल करणार असे आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉ. पठाण यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा कीट नाही, शहरातील सफाईची दाणादाण उडालेली असताना, प्रचंड प्रमाणात रोगराई व घाण पसरलेली असताना मुख्याधिकारी यांना पुरस्कार मिळणे आश्चर्यकारक आहे. शासनाने सदर बाबींचा तपास केला आहे की नाही की त्यांनाही अंधारात ठेवण्यात आलेले आहे याची तक्रार कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात येईल असे आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog