आदिवासी प्रतिष्ठान आयोजित ह. भ. प. निलम ताई येवले यांच्या तर्फे साडी व खाऊ वाटप.
कळंब / मुळशी :- सचिन सागळे : आदिवासी प्रतिष्ठान यांच्या वतीने मा. श्री दिनेश जाधव यांच्या सहकार्याने तथा मा. सौ. ह.भ.प. निलम ताई येवले (कीर्तनकार) आणि येवले परिवार यांच्या हस्ते कळंब / मुळशी येथील आदिवासी वाडीत १५० महिलांना साड्यांचे तसेच लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमावेळी आदिवासी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री सचिन शंकर सागळे, उपाध्यक्ष मा. श्री रमेश वाघमारे, श्री अनिल वाघमारे, प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, महिला मंडळ कळंब तसेच समाजसेवक मा. श्री विजय येवले, सदस्य मा. श्री दिनेश जाधव, मा. सौ. सुप्रिया सागळे, श्री विरेश्वर सागळे, श्री देऊ घोघरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मा. सौ. निलम ताईंनी आपल्या कीर्तनातून महिलांना मार्गदर्शन करत प्रेरणादायी विचार मांडले. आदिवासीवाडी मुळशी ग्रामस्थ व महिलामंडळींनी कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.
या प्रसंगी आदिवासी प्रतिष्ठानतर्फे मा. सौ. सुप्रिया ताई सागळे यांच्या हस्ते मा. सौ. कीर्तनकार निलम ताईंना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुप्रिया ताईंनी निलम ताईंना आदिवासी समाजासाठी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
Comments
Post a Comment