अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सलग तिसऱ्या वर्षी देखील १००% निकाल.
तळा : नजीर पठाण :- अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड संस्था चे प्राथमिक शाळा, माध्यमिक हायस्कूल, इंजिनियर कॉलेज, महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे (आय.टी.आय )चालवत असून सिदी जफर शेखानी मेमोरियल टेक्निकल इन्स्टिट्यूट मुरुड हे गेले ४७ वर्ष कोकणातील युवकांना तांत्रिक क्षेत्रात सक्षम बनवण्याचा यशस्वी (ट्रेंड) करीत आहेत या मधून अनेक जण उत्तीर्ण होऊन नोकरी किंवा व्यवसाय स्वतंत्रपणे करून आपले उदरनिर्वाह करीत आहेत टेक्निकल इन्स्टिट्यूट मुरुड संस्थेच्या शैक्षणिक वर्ष२०२४/२५चा निकाल जाहीर झाले असून चालवल्या जाणाऱ्या चार ट्रेड मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून १०० टक्के यश मिळवले आहे प्रत्येक ट्रेड मधून प्राप्त केले आहे सलग तीन वर्षापासून संस्थेचा निकाल हा १०० टक्के लागला आहे शहबाज शब्बीर मलबारी मोटर मेकॅनिकल (फायनल )९५.५०% ,सनी संदेश पाटील इलेक्ट्रिशन (फायनल) ९२.५०% कलीम इम्तियाज आदमने मेकॅनिकल डिझेल९४. ८३%, आय्यान असिफ खोत वेल्डर ८४.३३ % ,प्रतिश दिपक पाटील मोटर मेकॅनिकल( प्रथम वर्ष )९१.३३% कविराज किशोर बलकावडे इलेक्ट्रिशियन (प्रथम वर्ष) ९१.५० % असे उत्तीर्ण विद्यार्थी असून उत्तम यश प्राप्त केला आहे या संस्थेचा प्रगती आलेख वाढतांना दिसून येत आहे संस्थेचे प्राचार्य इस्तियाक हमीद घलटे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या टेक्निकल कमिटीचे चेअरमन समीर जहीर दवनाक यांनी शिक्षकांचे श्रेय असून अधिकाधीक प्रगतीकडे लक्ष द्यावे व प्राचार्य, शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील काळासाठी सदिच्छा व्यक्त केली.
Comments
Post a Comment