तळा पत्रकार संघातर्फे शिक्षक दिन व साक्षरता दिन साजरा....

तळा : नझीर पठाण :- माजी राष्ट्रपती कै.सर्वपल्लीराधाकृष्णन यांचा ५सप्टेंबर जन्म दिन हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो  व ८सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो.५सप्टेंबर रोजी गौरी गणपती सणाची सुट्टी असल्याने शिक्षक दिन साजरा करता आला नाही आज ८सप्टेंबर साक्षरता दिन संयुक्तपणे तळा पत्रकार संघटना (रायगड प्रेस क्लब) तर्फे आयोजित करण्यात आला. शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवीत असतात. विद्यार्थी देशाचे सुजाण नागरिक व भावी पिढी आदर्शवंत घडावी देशाचे भवितव्य त्याच्यात हातात असून उत्तम शिक्षण देत असतात.अशा शिक्षकांना सन्मान करणे हेआपली सामाजिक बांधिलकी व कर्तव्य समजून साजरा करण्यात आला. तसेच८सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन युनेस्को परिषदेत ठराव संमत झाला.देशात १९६७सालापासून अमंलात आला निरक्षर राहू नये हाया मागचा उद्देश आहे बरीच प्रगती झालेली पहायला मिळत आहे म्हणून साक्षरता दिन साजरा केला यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष किशोर पितळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि देश घडविण्यात शिक्षकांचे मोठे योगदान असते गुरू जनांचा आदर ठेवला पाहिजे आपण देशाचे सुजाण नागरिक आहात गुरुनी दिलेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन भावी शिक्षण घ्यावे. गुरू ना शाळेला कधी विसरू नका.यावेळी माजी मुख्यमंत्री बँ.अंतुले व केंद्रीय अर्थमंत्री मंत्री सी डी देशमुख या महनीय व्यक्ती चा आदर्श समोर ठेवला.यावेळी सुनील बैकर सर यांनी शाळेसाठी विद्यार्थी शिष्यवृत्ती,मंथन परिक्षा,नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा स्पर्धापरीक्षा अशा विविध परीक्षा मार्गदर्शन करून जवळ पास पन्नास विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेत आहेत त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल विषेश सन्मान करण्यात आला.शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर मितल वावेकर निकम सर माडी मॅडम, गुरव, भोईरमँडम सह शिक्षकांना गौरविण्यात आले.यावेळी नजीर पठाण आंबेगावेसर पत्रकार खंडागळे सर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog