"भूप्रमाण केंद्र मधून सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा होईल.जिल्हा भूमी अधीक्षक - सुनील इंदलकर

 

तळा : नजीर पठाण : - देशाचे कर्तुत्वान, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, कर्मयोगी, विकास पुरुष, निःस्वार्थी, निर्भीड, लोकहितवादी, प्रखर राष्ट्रभक्त पंतप्रधान  नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवसाच्या औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी  अभिलेख कार्यालय माणगाव येथील जनतेला ऑनलाईन प्रकीया करून कामाचा निपटारा लवकर करण्यासाठी"भूप्रमाण केंद्र "याचे उद्घाटन दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रायगड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष  जिल्हाधिकारी माननीय किशन नारायणराव जावळे (भा.प्र.से) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या सीईओ भोसले मॅडम, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुनील इंदलकर, उपविभागीय अधिकारी संदिपान सानप  तहसीलदार दशरथ काळे,उप अधीक्षक भूमी अभिलेख, माणगाव गणेश सोनार साहेब व भू प्रमाण केंद्र संचालक उमेश साटम व त्यांच्या  सौ.स्मिता साटम,कर्मचारी सोनाली धामणे, हर्षदा सुतार तसेच उपअधीक्षक भूमी  अभिलेख कार्यालय माणगाव येथील कर्मचारी वर्ग तहसील कार्यालय माणगाव  येथील कर्मचारी वर्ग उपविभागीय अधिकारी माणगाव येथील कर्मचारी वर्ग व पत्रकार बंधू आणि ग्रामस्थ उपस्थित होते.या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे वेळी बोलताना भूमी अभिलेख रायगड जिल्हा अधीक्षक  श्री सुनील  इंदुरकर  यांनी बोलताना सांगितले की या भूप्रमाण केंद्र मधून सर्वसामान्य नागरिकांना चांगला फायदा होईल व जनतेला ऑनलाईन अर्ज शासकीय दरात भरून मिळेल व भुमी अभिलेख कार्यालय कामासाठी  हेलपाटे  मारण्याची आवश्यक लागणार नाही. व जनतेला कार्यालयातील भूप्रमाण केंद्रात बसून तत्काळ सेवा प्राप्त करू शकतील.   तसेच उपाधीक्षक भूमी अभिलेख यांनी जनतेला आव्हान केले आहे की, कार्यालयात९० दिवसांवर प्रलंबित मोजणी प्रकरणा यांनी विनंती अर्ज दिले आहेत. त्यांना पुढील महिन्यात मोजणी तारखा देण्यात येणार आहे. तरी त्यांनी त्यांच्या शेताची मोजणीकरण्यास सहकार्य करावे.व प्रलंबित कामाबाबत कार्यालय प्रमुख यांना अवश्य भेटावे.आसे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog