रोह्यात जनसुरक्षा कायदा विरोधात विरोधकांचा व कष्टकर्यांचा एल्गार
रेटुन पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत मंजुर करण्यात आलेला जनसुरक्षा कायदा हा सर्वसामान्य जनतेसाठी कष्टकर्यांच्या हक्कावर गदा आणणारा असुन फक्त भांडवलदाराच्या फायदाचा आहे. ह्या कायदामुळे आपण सरकारला प्रश्न सुध्दा विचारायला बंधने येणार आहेत, आंदोलन करण्याच्या मुलभुत हक्कावर गदा आणणारा हा कायदा रद्द केलाच पाहिजे,
ह्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनदादा सपकाळ साहेब व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माननीय महेंद्रशेठ घरत यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडी चे सर्व घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट), माकप, भाकप, सर्वहारा जनआंदोलन व भारत जोडो अभियान यांच्यातर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधी रोह्यात पदयात्रा काढण्यात आली होती .ह्या यात्रेत जनतेचा बहुसंख्य प्रतिसाद होता. कष्टकरी जनतेचा सुध्दा प्रचंड प्रमाणात सहभाग होता. ह्याप्रसंगी सर्व आंदोलनकर्त्यानी मोर्चा काढल्यावर तहसीलदारांना निवेदन दिले. ह्या प्रसंगी रोहा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष सुनिलदादा देशमुख,सर्वहारा जनआंदोलनाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सोपानजी सुतार, वाघमारे, तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नितिनजी वारंगे ,राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तुषार खरिवले, कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हरिओमभाऊ टाळकुटे, रोहा तालुका काँग्रेस अल्पसंख्याक सेल अध्यक्ष फैसलभाई अधिकारी, रोहा तालुका पर्यावरण सेलचे अध्यक्ष मारुती दादा फाटक यांसह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment