छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पळसधरी येथे वृक्षारोपण

राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम

पळसधरी (कर्जत) पंकेश जाधव :  दिनांक 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने पळसधरी येथे वृक्षारोपणाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक न्याय, समता आणि पर्यावरण संवर्धनाचे भान जपत फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन "झाडे लावा, झाडे जगवा" या प्रेरणादायी घोषवाक्यासह नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.

या उपक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजा प्रताप सुर्वे यांच्यासह सौ. सुवर्णा सुर्वे, दिव्यांशू सुर्वे, कांचन देशमुख, पल्लवी कनोजे, सूरज वाघमारे, मनीषा पवार, शंतनू सुर्वे तसेच परिसरातील महिला, युवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी विविध प्रकारच्या देशी झाडांचे रोपण करून निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे आयोजन करताना शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून प्रत्येकाने निसर्ग संवर्धनात आपला वाटा उचलणे आवश्यक असल्याचे मत फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या निमित्ताने परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता वाढवण्यास हातभार लागल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या पुढाकाराने झालेला हा उपक्रम भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवळ निर्माण करणारा ठरेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog