सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंकेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचा गौरव

रायगड (राकेश हुले)  कर्जत तालुक्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पंकेश मधुकर जाधव यांचा वाढदिवस. सामाजिक न्यायासाठी लढणारे, जनतेच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवणारे आणि आदिवासी, गरीब, महिला, वंचितांसाठी सदैव कार्यरत असलेले डॉ. जाधव यांनी आपल्या निस्वार्थ सेवेतून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

लहानपणापासूनच समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ घेऊन त्यांनी शिक्षण घेतानाच सामाजिक कार्यात पाय ठेवला. त्यांचे कार्य हे फक्त कार्यालयीन बैठका किंवा भाषणांपुरते मर्यादित नसून, त्यांनी गावोगाव जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी स्वतः पुढे सरसावलो. डॉ. जाधव यांनी अनेक गरजूंना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांचा विशेष भर आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर आहे. त्यांनी अनेक कुटुंबांना घरकुल योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, पाणीपुरवठा योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला.

डॉ. पंकेश जाधव यांनी स्थापन केलेली ‘माऊली फाऊंडेशन’ ही संस्था आज कर्जत तालुक्यात समाजकार्याचा प्रभावी चेहरा बनली आहे. या संस्थेद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, महिला आरोग्य जनजागृती मोहिमा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, जलसंवर्धन व स्वच्छता अभियान इत्यादी उपक्रम सातत्याने राबवले जातात. विशेष म्हणजे कोरोना काळात डॉ. जाधव यांनी स्वतः पुढे येत गरजूंसाठी अन्नधान्य, औषधे, मास्क, सॅनिटायझर तसेच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ‘कोरोना योद्धा गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. जाधव हे एक निर्भीड पत्रकारसुद्धा आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासांविरोधात त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला आहे. कर्जत शहरातील खड्ड्यांमुळे होणारे अपघात, सरकारी हॉस्पिटलमधील असुविधा, महावितरणचा अनियमित वीजपुरवठा, शहरातील वाहतूक कोंडी, पार्किंग अभाव, तसेच आत्महत्येच्या घटनांमागील मानसिक आरोग्य समस्या या सर्व विषयांवर त्यांनी ठामपणे आणि निर्भीडपणे बातम्या लिहिल्या आहेत. त्यांच्या या पत्रकारितेमुळे अनेक वेळा प्रशासनाला खडबडून जाग यावी लागली.

त्यांच्या कार्याची दखल घेत विविध संस्थांकडून त्यांना विविध   पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.  वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे, हारतुरे घेणे नसून तो एक सेवा-संकल्प असावा, ही भावना डॉ. जाधव यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे.

डॉ. पंकेश जाधव यांचे कार्य हे समाजसेवकांसाठी, तरुणांसाठी आणि पत्रकारांसाठी एक आदर्श ठरत आहे. त्यांनी आजवर प्रसिद्धीच्या झगमगाटाऐवजी जनसेवेचा मार्ग निवडला आणि लोकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवत राहिले. भविष्यात आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारणे, मोफत आरोग्य केंद्र आणि  महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. अनाथ आश्रम बांधणे,सुरू करणे, आत्महत्या प्रतिबंधक समुपदेशन केंद्र उभारणे यासारखे उपक्रम त्यांच्या मनात आहेत. त्यांची ही सामाजिक दृष्टी आणि कृतीशील नेतृत्व हे निश्चितच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.

Comments

Popular posts from this blog