कासारवडवली आदितीची गगनभरारी !
मुंबई : सतिश पाटील :- ठाणे, घोडबंदर रोड (कासारवडवली) गावचे प्रतिष्ठान व्यावसायिक शिवसेना उपविभागप्रमुख मा.साजन कासार यांची सुकन्या कु आदिती साजन कासार ही पायलट झाल्यावरबद्दल तिचे अभिनंदन करून भावी गगन भरारी साठी शुभेच्छा देताना अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष: आदरणीय श्री.दशरथ दादा पाटील, शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख श्री.वासुदेव भोईर, प्रख्यात पत्रकार मा.श्री.सतिश वि.पाटील सोबत आदीती चे आईवडील उपस्थित होते.
या मेहनती ,हुशार मुलीने आगरी समाजातील विद्यार्थी क्षेत्रातील युवक वर्गाला आदर्श निर्माण केला आहे "मेहनत करने वालो की कभी हार नही होती " आपल्या करीअर मध्ये मेहनत व जिद्द असू दे यशवंत होणारच अथक मेहनत करून या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली .आपल्या देशाचे नाव, आईवडील, समाज व गावाचे नाव उंच शिखरावर घेऊन जाणे हीच सदिच्छा!
आदितीने 12वी नंतर बाॅम्बे फ्लाईंग क्लब प्रवेश घेतला.नंतर 2020 DGCA परिक्षा पुर्ण केली.पुढे शिकण्यासाठी धुळे 1/2 वर्ष सिंगल इंजिन प्रशिक्षण घेतले.नंतर मल्टी इंजीन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी गुजरात फ्लाईंग क्लब मधून प्रशिक्षण पुर्ण केले. सर्व स्थरांतून आदितीचे अभिनंदन करण्यासाठी निवासस्थानी
नामदार मा.प्रतापजी सरनाईक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य सोबत आमदार शिवाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थितीत होते.सर्व स्थरांतून अदिती चे कौतुक व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment