आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली 2025
मुबंई : सतिश पाटील :- आगरी समाज वधूवर सामुदायिक विवाह सोहळा गेल्या पाच वर्षांपासून अविरत समाज कार्य कार्य करीत आहेत. एका मंचावर आतापर्यंत 7,5,11,9 यंदा 16 सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, उपरोक्त मंडळाचे लक्ष जास्तीत जास्त विवाह करून देण्याचे आहे. यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्ते अविरत दिवसरात्र निमंत्रण व नियोजन ,आगरी वधूवर सुचक मंडळ करीत आहे पत्रीका बघणे इच्छुक वधूवरांची समोरासमोर बसून भेटीगाठी फोटो ,नातेवाईक समोर बघण्याचा कार्यक्रम होतो. पुढे ठरलेल्या वधूवरांचे विवाह सोहळ्याची पुर्ण जबाबदारी मंडळ स्वीकारते तसेच ज्यांचे विवाह आधी ठरलाय अशा जोडप्यांना ही प्राधान्य दिले .यंदा 16 इच्छुक वधूवरांचा विवाह सोहळा पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवलीत मोठया थाटामाटात पार पडला.सर्वात मोठे योगदान मा.राजू दादा पाटील यांचे असते प्रत्येक जोडप्याला एक लाख आहेर स्वरूपात दिला जातो. या विवाह सोहोळ्यात मा.राजू दादा पाटील, मा.सुरेश पाटील (बाळ्या मामा) विद्यमान आमदार मा.राजेश मोरे , मा.रमेशसेठ पाटील,मा.प्रल्हाद म्हात्रे यांचे योगदान व उपस्थिती असते.मंडळाचे अध्यक्ष: गंगाराम शेलार, सचिव: कोमासकर,खजिनदार: हनुमान पाटील, सदस्य: शशी पाटील, डाॅ.शोभाताई पाटील, सल्लागार: तृप्ती पाटील तसेच धवलीरीन: दासरी ताई, अवनी पाटील, संगीता ताई पाटील ,आगरी समाज पुरोहित:अजीत म्हात्रे व सहकारी यांच्या कडून विधीवत लग्न सोहळा संपन्न झाला. मुबंई पत्रकार : श्री.सतिश वि.पाटील तसेच (घारीवली गाव )आगरी डाॅक्टर टिम उपस्थिती होती.
उद्दीष्ट: आजच्या भयंकर महागाई त सामान्य नागरिकांचे हाल होतात कर्ज काढून, जागाजमीन विकून लग्न करू नका हा हेतू मंडळाचा आहे या सोहोळ्यात सर्व आपल्या घरच्यासारखे आयोजन केले जाते .पोळा-पापडी ते होमहवन,सर्व वराडाला जेवण,आईस्क्रीम ची व्यवस्था केली जाते.भव्य स्टेज,बॅन्ड पथक, ऑर्केस्ट्रा सर्व विनामूल्य पुरवले जाते.फक्त वधूवर घेऊन येणे .नवरदेवाचे स्वागत ,पायधुणे ,कान चिंबळणे, मानपान व भोजन व्यवस्था केली जाते.या समाज कार्याचे कौतुक समाजात व इतर समाजात होत आहे. पुढेही जास्तीत जास्त विनामूल्य विवाह सोहोळ्याचे आयोजन करण्याचा मंडळाचा मानस आहे.या महान कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असतात आणि यथाशक्ती सढळ हस्ते आर्थिक व वस्तूरूपात मदत ही करतात त्या सर्वांचे मंडळ आभार व्यक्त करते."एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हे ब्रीद वाक्य आहे. खास आकर्षण यंदा आगरी साहित्य शाळेकडून समाज प्रबोधन फलक लावण्यात आले होते, लग्न सोहळा निशुल्क करण्यात येतो.
Comments
Post a Comment