Posts

Showing posts from May, 2025
Image
  गेमिंग क्षेत्र विस्तारत असल्याने या क्षेत्रातील नवनिर्मात्यांना नवनवीन संधी  उपलब्ध होणार  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रिएटर आणि प्लॅटफॉर्मस गोलमेज परिषदेत गेमिंगसह मराठी, कला संस्था आणि मनोरंजन क्षेत्रातील समस्यांबाबत  चर्चा मुंबई : प्रतिनिधी :-  महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत. या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जिओ वर्ल्ड सेंटर येथे जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या सहकार्याने क्रिअटर आणि प्लॅटफॉर्मस उद्योगातील प्रमुखांशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस गोलमेज बैठकीत बोलत होते. महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे. त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय पारंपरिक खेळांचे आधुनिक रूपांतर करून त्यांचे आयपी (...
Image
  आगरी समाज प्रबोधन संस्था डोंबिवली 2025  मुबंई : सतिश पाटील :- आगरी समाज वधूवर सामुदायिक विवाह सोहळा गेल्या पाच वर्षांपासून अविरत समाज कार्य कार्य करीत आहेत. एका मंचावर आतापर्यंत 7,5,11,9 यंदा 16 सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, उपरोक्त मंडळाचे लक्ष जास्तीत जास्त विवाह करून देण्याचे आहे. यासाठी मंडळातील सर्व कार्यकर्ते अविरत दिवसरात्र निमंत्रण व नियोजन ,आगरी वधूवर सुचक मंडळ  करीत आहे पत्रीका बघणे इच्छुक वधूवरांची समोरासमोर बसून भेटीगाठी फोटो ,नातेवाईक समोर बघण्याचा कार्यक्रम होतो. पुढे ठरलेल्या वधूवरांचे विवाह सोहळ्याची पुर्ण जबाबदारी मंडळ स्वीकारते तसेच ज्यांचे  विवाह आधी ठरलाय अशा जोडप्यांना ही प्राधान्य दिले .यंदा 16 इच्छुक वधूवरांचा विवाह सोहळा  पिंपळेश्वर महादेव मंदिर डोंबिवलीत मोठया थाटामाटात पार पडला.सर्वात मोठे योगदान मा.राजू दादा पाटील यांचे असते प्रत्येक जोडप्याला एक लाख आहेर स्वरूपात दिला जातो. या विवाह सोहोळ्यात मा.राजू दादा पाटील, मा.सुरेश पाटील (बाळ्या मामा) विद्यमान आमदार मा.राजेश मोरे , मा.रमेशसेठ पाटील,मा.प्रल्हाद म्हात्रे यांचे य...
Image
  महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन उत्सवामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा : प्रतिनिधी :- महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन असून या महोत्सवामुळे पर्यटन वाढीला निश्चितपणे चालना मिळेल व या पर्यटन उत्सावामुळे महाबळेश्वरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला.    महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित दि. 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याहस्ते झाले. या प्रसंगी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार तुकारात ताके, पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, अपर जिल्हाधिकारी मिल्लार्जुन माने, अतिरिक्...