गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण ?

मुलुंड : सतिश पाटील : - पुणे : गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; आरोग्‍य विभागाचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर दीनानाथ रुग्‍णालयाने त्‍या गर्भवतीला भरती करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्‍यांनी भरती व उपचार केले नाही, ही त्‍यांची चूक असल्‍याचा ठपका ठेवला आहे.

 गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणात नेमण्यात आलेल्या समितीने प्राथमिक चौकशी अहवाल शासनाला सादर केला असून, रुग्णालयाची ही चूकच असल्याचे म्हंटले आहे. आरोग्‍य विभागाच्‍या चौकशी समितीद्वारे शुक्रवारी युद्धपातळीवर चौकशी पुर्ण करण्‍यात आली. त्‍यात दीनानाथ रुग्‍णालयाने त्‍या गर्भवतीला भरती करून घेणे गरजेचे होते. मात्र, त्‍यांनी भरती व उपचार केले नाही, ही त्‍यांची चूक असल्‍याचा ठपका ठेवला आहे. येत्‍या दोन ते तीन दिवसांत सविस्‍तर अहवाल सादर केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्यूप्रकरणात शासनाने चौकशी समिती नेमली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात उपचारासाठी २८ मार्च रोजी तनिषा आली होती. नातेवाईकांनी तिला रुग्‍णालयातील स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना दाखवले. डॉ. घैसास यांनी त्‍यांना जोखमीच्‍या प्रसूतीच्‍या उपचारासाठी भरती होण्‍यास सांगितले. त्‍यावेळी त्‍यांना १० लाख रुपये अनामत रक्‍कम भरण्‍यास सांगितली. मात्र, नातेवाईकांकडे २ ते ३ लाख रुपये भरण्‍याची तयारी दाखवूनही त्‍यांना भरती न केल्‍याचा आरोप नातेवाइकांनी केला. नंतर नातेवाईक गर्भवतीला घेउन आधी ससूनला गेले. परंतु तेथील गर्दी पाहून नंतर ते वाकड येथील सूर्या मदर ॲड चाइल्ड रुग्‍णालयात भरती झाले. तेथे त्‍यांना दोन जुळ्या मुली झाल्‍या. मात्र, गर्भवतीची प्रकृती खालावल्‍याने तिला बाणेरच्‍या मणिपाल रुग्‍णालयात दाखल केले. तेथे तिचा उपचारादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला. योग्य वेळी उपचार हाॅस्पिटलकडून न मिळाल्याने महिलेचा मृत्यु लोक प्रतीनीधी   व सरकार काय मुग गिळून गप्प रहाणार का सामान्य जनतेचा जीव स्वस्त झालाय का ? योजना काय फक्त कागदावरच का ?

प्रशासन यावर लक्ष केंद्रित करणार का नाही ? अशा परिस्थितीत आधी रूग्णाला उपचार द्यावे ही जबाबदारी नाही का ? आता काय कारवाई होणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.

Comments

Popular posts from this blog