जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन
पालघर : प्रतिनिधी :- अनुसूचीत जाती, अनुसूचीत जनजाती व वंचित दुर्बल घटकांतील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडुन विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी याउद्देशाने दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमीत्त दि.8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत पालघर जिल्हयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानिमीत्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाभरामध्ये करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज दि.14 एप्रिल,2025 रोजी डॉ.इंदु राणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवन, पालघर येथे भारतीय संविधानाबाबत जनजागृती होऊन ते लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी संविधानाच्या प्रस्ताविकेचे (Preamble) वाचन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनोज रानडे, अप्पर जिल्हाधिकारी, भाऊसाहेब फटांगरे, जिल्हा नियेजन अधिकारी, प्रशांत भामरे, सहायक आयुक्त, समाज कल्याण,पांडुरंग वाबळे व जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
Comments
Post a Comment