मुझैन परवेज कारभारी व कियान तब्रेज कारभारी रोजा पुर्ण.

तळा : नझीर पठाण :- मुझैन परवेज कारभारी रा.राजपुरी वय ६यांने व कियान तब्रेज कारभारी वय५ वर्ष या भावाने रमजानच्या पवित्र सणाचे रोजा (उपवास) पूर्ण केला आहे मुस्लिम समाजात रमजान या पवित्र सणात सर्वच रोजा करीत असतात. कुराण व नमाज पडला जात असतो. आपली संस्कृती व संस्कार हे लहानपणी दिले तर टीकून रहातात.अगदी कमी वयात पहिलाच रोजा धरला होता तो पूर्ण झाल्याने त्या दोन  बालकांचे मुस्लिम बांधवाकडून नातेवाईकां कडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.राजपुरी येथे या मुलाने रमजानचा पवित्र महिना सुरू असून देखील अशा उष्णतेच्या काळात लहान मुले व वृद्ध मंडळी सर्वच जण मुस्लिम धर्मीय रोजा पकडतात या मुलांचे विशेष कौतुक केले जात आहे रमजानच्या या पवित्र महिन्यात जवळपास १२/१ ४ तासाचा उपास पाळताना कोणतेही अन्न व पाणी घेतले जात नाही. तापमान वाढत असतानाही लहान मुले आपल्या पहिल्या रोजाचा अनुभव घेत असून  वृद्ध मंडळी उपासासह इबादतीत रमलेली असतात अशा परिस्थितीत धर्माविषयी निष्ठा आणि उपासाचे पालन करताना दाखवलेल्या संयम हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या या प्रयत्न बद्दल राजपुरी येथील समाजात नातेवाईकांकडून आनंदाचे व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog