समीर शेडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. 

समीर शेडगेंमुळे आठ वर्षांनी विजयी मिरवणूकीचा योग.- खासदार तटकरे 

रोहा : प्रतिनिधी :- रोह्याचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख समीर शेडगे व त्यांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शेडगे यांच्या प्रवेशाने पक्षाला संस्मरणीय नवीन ऊर्जा मिळणार असून यापुढे रोह्याच्या विकासासाठी एकत्रपणे काम करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रमाणात मजबूत करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. समीर शेडगे हा कामाचा, कष्टाचा आणि मेहनत घेणारा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याचे मी जाहीरपणे कौतुक करतो. त्यांचे आणि आमच्या घराण्याचे 3 पिढ्यांचे नाते आहे. आमचे राजकीय मतभेद होते. परंतु मनभेद नव्हते. मात्र समीर शेडगे यांच्या प्रवेशाने राजकीय मतभेद देखील दूर झाले असून सर्वांना सोबत घेऊन आपल्याला शहराच्या विकासासाठी काम कराला मिळेल. अशी ग्वाही खा. सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी निघालेली भव्यदिव्य मिरवणुक आणि फटाक्यांच्या होत असलेल्या आतिषबाजीचा उल्लेख करताना खासदार तटकरे यांनी आठ वर्षात वारंवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतरही रोह्यात एकदाही विजयी मिरवणूक निघाली नसल्याचे शल्य व्यक्त केले. मात्र तो योग आज एकत्रितपणे आल्याने समाधानही व्यक्त केले. ऐतिहासिक राममारुती चौक येथे रविवारी (ता.१३) रात्री आयोजित जाहीर पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी खा. सुनिल तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ना.अदिती तटकरे, माजी आम.अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, सरचिटणीस सुरेश मगर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष व माजी तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या समवेत उपतालुका प्रमुख महादेव साळवी, तालुका महिला संघटक नीता हजारे, शहर महिला संघटक समीक्षा बामणे, अनिकेत साळवी, आदित्य कोंढाळकर, अमित कासट, इरफान दर्जी, समाजसेवक बिलाल मोरबेकर, मुजम्मील येरुणकर, समीर दाखवे, हर्षद साळवी, गणेश हजारे, मजहर सिद्दीक, जव्वाद कुवारे, प्रकाश कोळी आदी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खा. सुनिल तटकरे व ना. अदिती तटकरे, माजी आम. अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

आपले मनोगत व्यक्त करत असताना खा. सुनिल तटकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने रायगडावर देशाचे गृहमंत्री आले. त्यानंतर स्नेहभोजनासाठी सारी मंडळी आपल्या सुतारवाडी येथे येत असताना सलग दोन चार दिवस टीव्हीवर  सारख्या याच संदर्भात बातम्या दिसत होत्या. हि बाब आपल्या जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या तालुक्यासाठी देखील उल्लेखनिय बाब आहे. अदिती, अनिकेत आणि समीर यापुढे रोहे तालुका व जिल्ह्याच्या विकासासाठी कामे करतील. त्यामुळे मला महाराष्ट्र आणि केंद्रात काम करण्यासाठी मोकळीक मिळाली आहे. आता उद्याच्या भवितव्यासाठी उद्याच्या उषाकालामध्ये अधिक साकारलेले स्वप्न साकारणे हे काम पहाणे जरुरीचे आहे, असे सांगत समीरने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला. आता दर आठवड्याला पक्ष प्रवेशासाठी तुम्ही अनिकेत भाई सोबत कार्यक्रम घेत जा. तुमचे माझ्यावर प्रेम आहे. आणि या पुढेहि कायम राहील. आता या पुढे नव्या जुन्यांचा वाद राहणार नाही. सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करतील असा विश्वास देखील खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. 

चौकट : समीर शेडगे हे तटकरे साहेबांच्या मुशीतून तयार झाले आहेत. शिवसेनेतून ते पुन्हा आपल्या कुटुंबात सामील झाले आहेत. समज गैरसमज दूर झाल्यानंतर आपण सर्वजण परत एकदा एकत्र आलो आहोत समीर भाईच्या प्रवेशाने अनेकांच्या अडचणी दूर झाल्या आहेत. आता पर्यंत आपण लाडक्या बहिणीसाठी प्रामाणिक काम केलेत परंतु आता मला लाडका भाऊ मिळाला असे सांगत शहराच्या विकासासाठी आपण जोमाने कामाला लागू या असे प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे यांनी केले.

पक्ष प्रवेश सोहळ्यापूर्वी तीन बत्ती नाका ते राम मारुती चौक पर्यंत खा. सुनिल तटकरे व समीर शेडगे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांची वाजत गाजत भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली...

Comments

Popular posts from this blog