मृत्यूने हरवलं.... विज्ञानाने अमर केलं.
कर्जत : पंकेश जाधव :- वासिंद येथील रहिवासी अशोक नारायण चन्ने यांचा मुलगा प्रवीण अशोक चन्ने वय वर्षे ४४. याचे मेंदूत रक्तश्रव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आणि त्याच्या वडिलांनी व कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने त्याचे अवयव दान करण्यात आले.
प्रविण चन्ने हे रिलायन्स जियो मध्ये नौकरी करीत होते. त्यांचा रक्तदाब वाढल्याने मेंदूत रक्तश्राव झाला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.डोंबिवली एम्स हॉस्पीटल डॉक्टर्सनी चन्ने कुटुंबाला विश्वासात घेऊन प्रविणचे अवयव चांगले असून तुमची संमती असेल तर अवयव दान करू शकता. प्रवीण चे वडील व त्याचे तीन काका प्रवीण ची पत्नी व इतर भाऊ यांनी यावर निर्णय घेतला आणि अवयव दानाला संमती दिली.सामाजिक भान असलेले हे चन्ने कुटुंब मुळचे खर्डी येथील रहिवासी आहेत. प्रविणचे काका अविनाश चन्ने हे पँथर चळवळीतील कार्यकर्ते आहेत.
अवयव दान गरजूना तात्काळ पाठवन्याय आले. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, डी वाय पाटील पुणे हॉस्पिटल, ननावटी हॉस्पिटल, फोर्टीज हॉस्पिटल मुलुंड यांनी अवयव घेऊन गेले. यात किडनी, फुफुस, डोळे, इतर अवयव नेण्यात आले. मुख्य अवयव हृदय मात्र योग्य पद्धतीने काढता न आल्याने ते बाद ठरवण्यात आले.
प्रविण चन्ने जरी मृत झाला असला तरी तो अवयव दानाने अमर झालेला आहे.तो डोळ्यांनी पाहू शकतो. त्याची किडनी फुफुस जीवित ठेवण्यात विज्ञान विजयी झालेलं आहे.
Comments
Post a Comment