आवलस गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी, पण संविधान पाटीची दुर्दशा; केतन जाधव यांचा सवाल
कर्जत : पंकेश जाधव :- कर्जत तालुक्यातील आवलस गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर गावातील संविधान पाटीची झालेली उपेक्षा आणि दुर्लक्ष लक्ष वेधून घेत आहे.
गावातील मुख्य चौकात असलेल्या संविधान पाटीवर धूळ साचलेली असून तिची स्वच्छता करण्यात कोणतीही काळजी घेतलेली दिसली नाही. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास किंवा संविधान पाटीला साधा हार देखील अर्पण करण्यात ग्रामस्थ विसरले, हेही प्रकर्षाने जाणवले.
या निष्काळजीपणावर सामाजिक कार्यकर्ते केतन जाधव यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “जयंतीच्या दिवशी बाबासाहेबांप्रती आदर व्यक्त करताना, त्यांच्या विचारांचे प्रतीक असलेल्या संविधानाची आणि त्याच्या पाटीची देखील तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त उत्सव साजरे करून बाबासाहेबांना खरं आदर दाखवता येत नाही. त्यांच्या विचारांची आणि त्यांच्या कार्याची योग्य जपणूक करणे ही खरी अभिवादनाची पद्धत आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते केतन जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले.
ग्रामस्थांच्या या अनास्थेमुळे काहीजणांनी मनापासून खंत व्यक्त केली.
Comments
Post a Comment