12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी
रायगड : प्रतिनिधी :- रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहॆ. या कार्यक्रमाकरीता नागरिक हे आपआपली वाहने घेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या काळात अपघात व वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दि.१२एप्रिल २०२५ रोजी सकाळी ००.०१ ते दुपारी १५.०० वाजेपर्यत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी करण्याची अधिसूचनेव्दारे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पारित केले आहेत.
सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहॆ.
Comments
Post a Comment