सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सातारा : प्रतिनिधी :- सैनिकांच्या बलीदानामुळेच आपल्या देशासह आपले कुटुंब सुरक्षित आहेत. सैनिकांबाबत संवेदनशिल आहे. एक कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतेश हंगे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते. माजी सैनिकांच्या जागेचा प्रश्न अनेक वर्षा पासून प्रलंबित आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, लोकसंख्येच्या आधारवर जमिनी खूप कमी आहेत. ज्या जमिनी माजी सैनिकांनी पसंत केल्या आहेत त्या शासकीय जागा विविध प्रकल्पांना देण्यात आलेल्या आहेत. अनेक काळापासून प्रलंबित असणारा सैनिकांच्या ...
Comments
Post a Comment