गेल कंपनी उसर कंपनीकडून सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता

वाहतूक बंदी अधिसूचना जारी

रायगड : प्रतिनिधी :- गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) ची वाहतूक करण्याकरीता वेलवली ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि.06 मार्च 2024 ते दि.9 मार्च 2024  या कालावधीकरिता सकाळी 4.00 ते सकाळी 8.00 वाजेपर्यंत बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी  जारी केली आहे.

यावेळी पर्यायी मार्ग म्हणून रोहा ते अलिबाग बाजूकडे येणाऱ्या सर्व वाहनांना वावेफाटा-चौलनाका-नागाव-सहाण बायपास मार्गे बेलकडे फाटा ते अलिबाग मार्ग तसेच अलिबाग ते रोहा बाजूकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना अलिबाग-बेलकडे फाटा-सहाण बायपास  मार्गे नागाव-चौलनाका- वावेफाटा मार्गे रोहा असे पर्यायी मार्ग आहेत.

भारत सरकारच्या गेल कंपनी उसर, ता.अलिबाग या कंपनीकडून वेलवली ते उसर अशी सेल (CARGO) चर्चा वाहतूक करण्याचे काम Fab-tach/works and Contruction Pvt. Ltd या कंपनीला मिळालेले आहे. कंपनीकडून तयार करण्यात आलेले 500 KTAPDH-PP Project चे वेलवली ते ऊसर गेल कंपनी अशी वाहतूक होणार असून सुमारे 1.5 कि.मी. अंतराचे आहे. याा ट्रान्सपोर्टचे काम M/S Prism Logistics Pvt.Ltd. या कंपनीकडून करण्यात येणार आहे. वाहतूक करण्यात येणाऱ्या सेलची रूंदी 9.80 मिटर व उंची 10.30 मिटर व लांबी 27.15 मिटर आहे. या सेलची वाहतुक ही दि.06 मार्च 2024 व दि.09 मार्च 2024 रोजी सकाळी 4.00 ते 8.00 वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासेल ची रूंदी व उंची जास्त असल्याकारणाने वाहतुकीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता सार्वजनिक बांधकाम खाते यांचा रुट सहें रिपोर्ट, एम.एस.इ.बी. व आर.टी.ओ यांच्याकडून योग्य तो उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबतच पत्र Fab-tach/works and Contruction Pvt.Ltd. या कंपनीने प्राप्त करुन घेतले आहे. 

ही वाहतूक करतेवेळी वाहतूक कोंडी निर्माण होणार असल्याने वाहन चालक व नागरीक यांना वाहतूक कोंडीचा त्रास होवू नये म्हणून उपाय योजनेच्या दृष्टिकोनातुन ही वाहतूक दि.06 मार्च 2024 व दि.09 मार्च 2024 रोजी सकाळी 4.00 ते 8.00 वाजेपर्यतच्या कालावधीत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 


Comments

Popular posts from this blog