उमाजी पवार यांचे दुःखद निधन
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवाशी उमाजी भिवा पवार यांचे सोमवार दि.११ मार्च २०२४ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८४ वर्षाचे होते.ते परोपकारी व अतिशय प्रेमळ स्वभावाने सर्वांना परिचित होते.त्यांच्या पत्नीचे निधन अतिशय तरुण वयात विज पडून झाले होते व त्यात तेही जखमी झाले होते परंतु त्या दुःखातून सावरून त्यांनी आपल्या मुलांना आईची उणीव भासू न देता मोठे केले.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक,सामाजिक, राजकीय,शैक्षणिक,क्षेत्रातील असंख्य नागरिक व समस्थ गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,तीन सुना,पुतणे,नातवंडे,पतवंडे व मोठा पवार परिवार आहे त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.२० मार्च व उत्तर कार्य विधी शुक्रवार दि.२२ मार्च २०२४ रोजी त्याच्या निवास्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment