मुक बधीर विद्यार्थ्यांसमवेत कामगार नेते सुरेश पाटील यांचा वाढदिवस साजरा.
उरण (विठ्ठल ममताबादे) :- भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री,कामगार नेते सुरेश पाटील यांचा वाढदिवस मुक बधीर विद्यार्थी यांच्या समवेत पंढरपूर येथे साजरा करण्यात आला.भारतीय मजदूर संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन पंढरपूर येथे आयोजित केले होते. या अधिवेशनाच्या आयोजनासाठी सुरेश पाटील हे पंढरपूर येथे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी उपस्थित होते.त्या निमित्ताने त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन पंढरपूर येथील वै.रखुमाबई भीमराव शिंदे या मूकबधिर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप व रोख रक्कम देणगी म्हणून दिली. सुरेश पाटील हे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई या शाळेचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष असून ते या विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वही व पेन भेट वस्तू देऊन विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेत साजरा करतात.या कार्यक्रमात रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख, डी.पी सोनवणे, मधुकर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या सेवाभावी व स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment