साहित्य ज्ञानगंगा व साहित्य ज्ञानतेज २०२५ या पुरस्काराचे आयोजन

उरण (विठ्ठल ममताबादे) :- पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांच्या आशिर्वादाने आणि रायगड भूषण प्रा.एल बी पाटील यांच्या प्रेरणेतून कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण यांच्या सौजन्याने  साहित्य ज्ञानगंगा व साहित्य ज्ञानतेज २०२५ या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.

 हे पुरस्कार प्राप्त करण्यासाठी  ३०० गुणांची प्रश्न मंजूषात्मक स्पर्धा ऑनलाईन मधुबन आणि राज्यस्तरीय कोमसाप काव्य स्पर्धा या व्हाट्सअप समूहावर दर महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी संपन्न होणार आहे. या स्पर्धेत साहित्य विश्वातील घडामोडी,मराठी भाषेचा इतिहास,साहित्यिक प्रवास,विविध काव्य कथा प्रकार त्यांची वैशिष्ट्य आदि घटकावर ३०० गुणांची प्रश्न मंजूषात्मक स्पर्धा संपन्न आहे.या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवणा-या पाच स्पर्धकांना साहित्य ज्ञानगंगा हा पुरस्कार व रोख रक्कम २०००/रू ,प्रमाणपत्र,शाॅल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल , त्याच प्रमाणे पाच स्पर्धकांना उपविजेते म्हणून साहित्य ज्ञानतेज हा पुरस्कार,रोख रक्कम १०००/-रू,प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल.या प्रश्न मंजूषात्मक स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख  २०/३/२०२४ ही असून या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दि. १३/४/२०२४ रोजी होणार आहे.या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही.तरी  इच्छुक साहित्यिक कवी लेखकांनी  सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी उरण कोकण मराठी साहित्य परिषद शाखाध्यक्ष मच्छिंद्रनाथ म्हात्रे मोबाईल नंबर 9819652951 यांच्याशी संपर्क साधावा .

Comments

Popular posts from this blog