वाकण नाका येथे निवारा शेड उपलब्ध झाल्यामुळे मनाला समाधान :- आ.अनिकेत तटकरे
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- वाकण नाका प्रवासाचा दृष्टीने मोठा नाका आहे येथे विद्यार्थी,वयोवृद्ध तसेच पाली बल्लाळेश्वर कडे,तसेच मुंबई, पुणे,रत्नागिरी कडे जाणाऱ्या प्रवाश्यांची संख्या जास्त असते यामुळे येथे बस स्थांब्याची मोठी गरज होती. परंतु रस्त्याच्या रुंदीकरणामुळे विलंब झाला व एक बाजू पुर्ण झाल्यामुळे येथे आमदार निधीतून ६ लाख रुपये खर्च करून आरसीसी मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे वेळेवर बस स्थांबा बांधण्यात आल्याचे मानसिक समाधान झाले असल्याचे मत या बस स्थांब्याचे उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
या बस स्थांब्याचे बांधकाम हे आरसीसी मध्ये यासाठी करण्यात आले आहे की बस स्थांब्याच्यावर वर्षाचे ३६५ दिवस सेवा देणाऱ्या पोलिसांसाठी एक पोलिस चौकी बांधण्यात येईल.तसेच येथील कारखानदाकडून एक पाणपोई बांधण्यात यावी.तसेच तुकाराम राणे यांनी व्यक्त केलेल्या सूचनेनुसार येथे एक टॉयलेट उभारण्यात येईल व लाईटची सोय हि करण्यात येईल तसेच या परिसरातील गुन्हेगारीला आला घालण्यासाठी सी.सी.टी व्ही.कॅमेरा बसविण्यात येईल असे आ.अनिकेत तटकरे यांनी सांगितले.
यावेळी माजी सभापती सदानंद गायकर, पाटणसई ग्रामपंचायत सरपंच माधवी गायकर,उपसरपंच सुरेश गायकर,शिवराम भाऊ शिंदे, मधुकर ठमके,पांडुरंग गायकर,भाई टक्के,पो.नि.हरेश काळसेकर,पो.विनोद पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष मदन गायकर,अनंत कोतवाल,रामचंद्र कोतवाल,सुरेश शिंगडे, तुकाराम राणे,संतोष कोळी, उदय जवके,राजेंद्र जोशी, सचिन कळस्कर,प्रकाश मोरे,ग्रामसेविका व वाकण तसेच पाटणसई येथील असंख्य ग्रामस्थ,तरुण वर्ग,महिला वर्ग उपस्थित होते.
Comments
Post a Comment