नेते बॅनर बाजी विकास कामाच्या उद्घाटन निमंत्रक पत्रिकेच्या प्रोटोकॉल मध्ये आणि कार्यकर्ते संघटन वाडीच्या संघर्षात

रायगड : प्रसाद मोरे :- लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊन आचारसंहिता लागू शकतात याचा धसका सर्वच पक्षाच्या नेते मंडळी उमेदवाराने घेतलेला दिसत आहे त्यामुळे मिळेल त्या वेळात आपले पक्षाचे शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी वेगवेगळे बॅनर बाजी तसेच उद्घाटन कार्यकर्ता मेळावे ब्लॉक सभा मिरवणुका याने रायगड जिल्ह्याचे वातावरण तापलेले दिसत आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलेच आहे कधीही निवडणूक आचारसंहिता लागू शकतात त्यामुळे सर्वच पक्षांची अस्तित्वाच्या लढायची तारांबळ उडालेली दिसत आहे राज्यात महाविकास आघाडीचे फूट तुटीचे सरकार त्यामुळे सत्तेत सामील असलेला प्रत्येक पक्ष सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नावावर आपल्या पक्षाची ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

 सत्ये वाचून राहावे ना तुझ्या विना करमेना अशा विवंचनेत असलेले पक्षप्रमुखांनी वेगवेगळ्या प्रकारची समीकरणे जुळवून सत्येत राहण्याचा  अथक प्रयत्न करत आहेत परंतु त्यांच्यातच निवडणुकीच्या तिकिटं वाटपावरून असलेला अंतर्गत वाद प्रसार माध्यमातून वेळोवेळी प्रकर्षाने जाणवतच आहे हे मतदार राजा पहातच आहे त्यात रायगड मतदार संघाची अवस्था फारच बिकट दिनांक १0 / 3 / २०२४ रोजी अशाच प्रकारचा विकास कामांचा उद्घाटन सोहळा कोलाड येथे पार पडला स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यटन विभागाचा घवघवीत निधी प्राप्त करून महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मार्फत निर्जीव अवस्थेत असलेल्या नाना नानी पार्कचे सुशोभीकरण दुरुस्ती व देखभाल करणे असे शासकीय निमंत्रित परिपत्रक काढून कार्यक्रम  राबवला शासन व प्रशासन मधील अधिकारी तसेच सर्व लोकप्रतिनिधींची नावे पत्रकावर  टाकून विकास कामाचा मोठा गाजावाजा केलेला दिसला,

परंतु सदरचा कार्यक्रम एक पक्षी राबवण्यात आलेला दिसला या नाना नानी च्या पार्कबद्दल यापूर्वी काही पत्रकाराने टाळेबंद विकास अशा प्रकारचे वक्तव्य व बातमी प्रसार माध्यमांना दिलेली होती तरीही शासनाला याचा काही फरक पडलेला दिसत नाही एकीकडे लोकांची महत्त्वाच्या विकासाच्या नावाने होणारी बोंबाबोंब पाहता हे लोकप्रतिनिधी मतदार राजांची कशी दिशाभूल करत आहे हे दिसत आहे  कार्यक्रमाचे स्वरूप महाविकास आघाडी असे बॅनरबाजी फोटो व निमंत्रण पत्रिका वरून दिसत असले तरी प्रत्यक्ष सहभाग हा एक पक्षीय दिसला त्यानंतर लगेचच त्या पक्षाचे कार्यकर्ता मेळाव्याचे स्वरूप कोलड नाक्यावर पाहावयास मिळाले त्यामध्ये या सर्व  कार्यक्रमात मतदार राजा वेगळीच चर्चा करताना दिसत होता नाना नानी पार्क भूमी पूजन हा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे असा जरी बॅनरबाजी व फोटो निमंत्रण पत्रिकेमधून दाखवण्यात आला तरी त्यात एका पक्षाचे अस्तित्व दाखवण्याचे धडपड होताना दिसत होती प्रत्यक्षात बॅनर बाजीवर जरी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावलेले असले तरी त्यांची कोठेही सरकारी कार्यक्रमात उपस्थिती जाणवली नाही याची चर्चा लोकांमध्ये होताना दिसली.



Comments

Popular posts from this blog