रोहा पुगाव येथे आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन.
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रोहा तालुक्यातील मौजे पुगाव ग्राम पंचायत हद्दीतील पुगाव येथे कोकण विकासाचे शिलेदार रायगड चे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे, यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ना.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,यांच्या सकल्पनेने गावातली विविध विकास कामांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच ग्रामस्थांनी केलेला पाठ-पुराव्याला यश आले असून त्याचे भूमिपूजन आ.अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला.
यावेळी आ. अनिकेत तटकरे, जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,नारायणराव धनवी,सुरेश महाबळे,महेंद्र पोटफोडे,सौ प्रीतम पाटील, राकेश शिंदे, प्रमोद म्हसकर, वसंत मरवडे, सूरज कचरे, संजय मांडलुस्कर, नीलम कळमकर, राम धूपकर, अदिती झोलगे, रचना कळमकर, सह मान्यवर व आदी पुगाव व बौद्धवाडी ग्रामस्थ व महिला, युवक मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी पुगांव गावातील विविध विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले असून प्रसंगी यावेळी मूलभूत सुविधा अंतर्गत रस्ता तयार करणे,मौजे पुगाव बौद्धवाडी स्मशानभूमी शेड,मौजे पुगाव बौद्धवाडी रस्ता,मूलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत दुरुस्ती,सह विविध विकासाच्या कामांचे भूमिपूजन आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
Comments
Post a Comment