कोलाड रेल्वे स्टेशनला दिवा सावंतवाडी रेल्वेगाडी थांबत नसल्यामुळे प्रवाश्यांकडून तीव्र संताप,
गैरसोय दुर करण्यासाठी लोकल रेल्वे सुरु करावी जनतेची मागणी
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- कोकण रेल्वेला उडदवणे येथून सुरुवात झाली असली तरी या कोकण रेल्वेचे पहिले रेल्वे स्टेशन कोलाड येथे आहे परंतु येथे दिवा सावंतवाडी रेल्वे गाडी थांबत नसल्यामुळे या परिसरातील जनते कडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोलाड परिसरात जवळ जवळ वाडया वस्त्या,मिळून ६५ ते ७० गावे असुन या परिसराचा दिवसेंदिवस झपाट्याने विकास होत आहे तसेच आजूबाजूला असणारे पर्यटन स्थळे यामुळे या परिसरात मुंबई,पुणे, ठाणे, व इतर ठिकाणाहून असंख्य पर्यटक येजा करीत असतात परंतु कोलाड रेल्वे स्टेशनला फक्त रत्नागिरी पॅसेंजर हि एकमेव गाडी थांबते दुसरी सुरु असणारी दिवा सावंतवाडी गाडी हि बंद करण्यात आली असुन यामुळे या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचे मोठे हाल होतांना दिसत आहे.
या शिवाय गोवे-कोलाड येथे श्रीमती गिता द. तटकरे पॉलीटेक्निकल,खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच नानासाहेब धर्माधिकारी कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय असुन येथे ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी तसेच विविध भागातील विद्यार्थी या कॉलेजला येत असुन या कॉलेजच्या बाजूनी कोकण रेल्वे जात असुन येथे रेल्वे स्टेशन नसल्यामुळे या कोकण रेल्वेचा कोणताही फायदा विद्यार्थ्यांना होत नाही जर येथे रेल्वे स्टेशन झाला तर येथील विद्यार्थ्यांसहित कोलाड खांब परिसरातील असंख्य गावातील नागरिकांना मोठा फायदा होईल.
याशिवाय कोकण रेल्वे वरील रोहा ते दिवा मार्ग फक्त ६६ किलोमीटर आहे येथे पोहचण्यासाठी ५३ मिनिटे लागतात विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील काही भाग तसेच,तळा,माणगाव, महाड,म्हसळा,श्रीवर्धन या सहा तालुक्यातील मुंबई-ठाण्याकडे नोकरीनिमित्त जाणारी लोकांची संख्या ही जास्त आहे.पण रोहा दिवा रेल्वेचा या परिसरातील लोकांना काहीच फायदा होत नाही.या शिवाय या स्टेशनवर थांबणारी दिवा-सावंतवाडी रेल्वे गाडी थांबत नाही यामुळे येथील नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे आधुनिक काळात शिक्षणाची प्रगती झपाट्याने होत आहे. त्यामुळे वीर ते पनवेल लोकल रेल्वे गाडी सुरु केल्याने मुंबई-ठाणे येथे जाऊन येथील विद्यार्थ्यांना पार्ट टाइम नोकरी करता येईल यामुळे आर्थिक फायदा होईल.याचबरोबर महिला ही आपले कुटुंब सांभाळून पार्ट टाइम नोकरी करू शकतील.तसेच या परिसरातील व्यावसाय वाढेल याशिवाय मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या जनतेची गैरसोय ही दुर होईल.या मार्गांवर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबत नसल्याने या रेल्वे मार्गांवरून पनवेल ते वीर लोकल रेल्वे गाडी सुरु करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
Comments
Post a Comment