कोलाडचा डोंगर वनव्याने होरपतोय,वनसंपदेची प्रचंड हानी, वानखत्याचे दुर्लक्ष

कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- गेली तीन चार दिवसापासून प्रचंड लावण्यात आलेल्या वनव्यामुळे रोहा तालुक्यातील कोलाड(आंबेवाडीचा ) डोंगर अक्षरशः वनव्यामुळे होरपळत आहे.तर सतत लावण्यात वनव्यामुळे वनसंपदेची मोठी हानी होत असुन यामुळे पर्यावरण प्रेमी नागरिकांचा जिव तुटत आहे. तर हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वनखात्याला याचे काहीही वाटत नसल्याने एकंदरीत परिस्थिती वरुन दिसत आहे. 

माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनादीकाळापासून वृक्षाची अक्षरशः कत्तलच चालवली आहे. सध्याच्या आधुनिकेतेच्या व तंत्रज्ञानाच्या युगात औद्योगिकरण व नागरिकीकरणाच्या नावाखाली जंगलच्या जंगले भुईसपाट होतांना दिसत आहेत.त्यामुळे अगोदर पर्यावरणाचे संतुलन पार बिघडले आहे. त्यातच भरीत भर म्हणून ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वनव्यामुळे अधिकच भर पडत आहे.

दरवर्षी मार्च महिना उजाडल्यावर वणवा लावण्याचे प्रमाण मोठे दिसून आहे.वनवे लावण्यावर कोणाचाही अंकुश नसल्याने व कायदयाचा धोका नसल्याने वणवा लावणाऱ्यांचे फावत आहे. शिकार करणे, वृक्षतोड करणे, वनसंपदा मिळवणे तसेच सरपणासाठी लागणारा लाकूडफाटा अशा विविध कामासाठी वनवे लावले जात असले  तरी ते कायद्याच्या चौकटी बाहेरचे आहे. परंतु वनखाते पुर्णपणे उदासीन दिसून येत आहे. कारण वनसंपदेची प्रचंड हानी करणाऱ्या या वनवे लावणाऱ्यांवर कधीही कार्यवाई झाल्याचे दिसून येत नाही.

 रोहा तालुक्यातील विपुल वन संपदा लाभलेल्या मोजक्याच जंगलामध्ये कोलाड आंबेवाडी येथील जंगलाचा समावेश होतो तर हा डोंगर मुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या विपुल वनसंपदेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांचे सहज लक्ष वेधून घेत आहे.त्यामुळे वनसंपदेबरोबर प्राण्यांच्या वास्तव्यावर देखील गदा येताना दिसत आहे. एवढे सर्व होऊन हि वनखाते निद्रावस्तेत दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog