खासदार म्हणून तटकरे साहेब पुन्हा एकदा दिल्लीला जातील तेव्हा तुम्ही न पाहिलेले स्वप्न पुर्ण होईल :- कृषी मंत्री धनंजय मुंडे
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण) :- आपल्या देशाचा अनेक वर्षाचा विकास व गेल्या दहा वर्षा पासुन विकास यात भरपूर फरक पडला आहे. या देशाची प्रतिष्ठा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मुळे वाढलेली आहे या कोकणाच्या विकासासाठी येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या काळात रायगडचे खासदार तटकरे साहेब पुन्हा एकदा दिल्लीला जातील तेव्हा या जनतेने न पाहिलेले स्वप्न पुर्ण होईल असे मनोगत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबेवाडी येथील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
तटकरे साहेब यांची तिसरी पिढी राजकारणात आहे.त्यासाठी स्वतःला झिजवावे लागते तेव्हा हे पहावयास मिळते.यासाठी तुमच्या सर्व कार्यकर्त्याची साथ तेवढीच महत्वाची आहे.हे दोन दिवसाच्या नात्यातुन व प्रेमातुन होत नाही अनेक वर्षाच्या नेतृत्वाने होते. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड असुन रायगड म्हणजेच रयतेची राजधानी या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी राजे यांच्या एक मेव पुतळ्याचे भूमिपूजन व नाना नानी पार्क नव्याने उभारण्यात येत आहे.
यावेळी खा. सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,नानाजी भौड, बाबुराव बामणे,रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे,नारायण धनवी,वसंत मरवडे,महेंद्र गुजर,प्रितम पाटील, दयाराम पवार,सुरेश महाबळे, महेंद्र पोटफोडे,राकेश शिंदे,नरेंद्र जाधव,मनोज शिर्के,संजय मांडळुस्कर व आंबेवाडी मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ता हे उपभोगण्याचे साधन नसून सत्ता हि लोकांची सेवा करण्याचे साधन आहे:-खा. सुनिल तटकरे
अजितदादांच्या नेतृत्वाखाली ४३ आमदारांनी एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.हि लोकांनी सेवा करण्यासाठी यामुळे राजकारणात संघर्ष येतात परंतु कर्तव्याची भान ठेऊन काम करावे लागते.यामुळे सत्ता हे उपभोगण्याचे साधन असु शकत नाही सत्ता हि लोकांची सेवा करण्याचे साधन आहे असे मत खा. सुनिल तटकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
ज्या भूमित मी जन्माला आलो त्या भूमित संभाजी राजे यांचे भूमिपूजन झाले.१९८४ ला वडिलांचे निधन झाले.४०वर्षे झाली मनाला पोरकेपणा वाटला पण या भागाणी कधीही पोरकेपणा दिला नाही. आंबेवाडी नाका व पेझारी नाका येथील जनतेने ताकद दिली.यांची कर्तव्याची जाण ठेवून काम करावे लागते.यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनी हि मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोणे सर यांनी केले.
Comments
Post a Comment