लोणेरे येथे बाबू ठाणा मटका जोमात, कारवाई न करणारे पोलीस गेले कोमात? 

बाबू ठाणाचा अवैध धंदा चालवतात रवी आणि पप्या

प्रभारी पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांचे दुर्लक्ष; पोलीस अधीक्षक कारवाई करणार का?

रायगड (प्रतिनिधी) :-  मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथे पेट्रोल पंपाजवळ एका सलूनच्या बाजूला "बाबू ठाणा" मटका जुगार जोमात सुरू असून येथील मोरेश्वर शोरूमच्या समोर बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. गोरेगाव पोलीसांच्या आशीर्वादाने हा अवैधलधंदा सुरू असल्याचे दिसून येत आहे. या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्यामुळे पोलीस कोमात गेले की काय? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

"बाबू ठाणा" नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा बेकायदा मटका आणि जुगार क्लब मोठ्या जोमाने सुरू असून पप्यालआणि रली नावाची माणसे हा अवैध धंदा चालवित आहेत. येथील अवैध धंद्यांना गोरेगांव पोलीसांनी लाखो रूपयांचा हफ्ता घेऊन संरक्षण दिल्याने येथील अवैध धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील मटका जुगारामुळे आणि जुगार क्लबमुळे येथील पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्याविरूद्ध पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी आणि क्लबमध्ये जुगार खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका आणि जुगार क्लबमुळे महिला वर्गातून देखील पोलीसांबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Comments

Popular posts from this blog