सामाजिक कार्यकर्ते तथा बॅंक सखी वर्षा जांबेकर यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार प्रदान
कोलाड (विश्वास निकम, रायगड भूषण):- रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या प्रेरणेने राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान आणि गुणिजन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला.या सोहळ्यात रोहा तालुक्यातील आमडोशी येथील वर्षा वासुदेव जांबेकर यांना राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभेहस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले.
आमडोशी येथील वर्षा जांबेकर या बॅंक सखी म्हणून काम करीत असुन या कामाबरोबच त्या विविध महिला बचत गटांना मार्गदर्शन करीत असतात त्यामुळे गेली दोन वर्षात त्यांना मिळालेला तिसरा पुरस्कार आहे.यावेळी ह. भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुनिल सावंत, ऍड. कृष्णाजी जगदाळे,प्रकाश सावंत, लक्ष्मणराव दाते, जनार्दन कोंडविलकर,नारायण वाणी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काराबद्दल वर्षा जांबेकर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment