लायन्स क्लब कोलाडच्या वतीने सुतारवाडी येथे मोफत नेत्रतपासणीत ७० जणांची तपासणी तर १० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया 

कोलाड  (विश्वास निकम, रायगड भूषण) :- रोहा तालुक्यातील मौजे सुतारवाडी येथे लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात रविवारी ७० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १० रुग्णांना लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग येथे यांच्यावर मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे .

रोहा तालुका तसेच कोलाड विभागात गेली तिन वर्ष सामाजिक आणि विविध स्तरावर काम करणाऱ्या कोलाड लायन्स क्लबच्या वतीने मागील वर्षभरात तीनशे ते चारशे नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग च्या माध्यमातुन केल्या आहेत तसेच कोलाड आंबेवाडी येथील डॉ गांधी नर्सिंग होम येथे दर बुधवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली असल्याने लायन्स क्लब कोलाड ग्रामीण भागात मोती बिंदू मुक्त कोलाड विभाग अभियान राबवत आहेत. यासाठी लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल ३२३१ ए ४ च्या व लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या मार्फत ग्रामीण भागात जाऊन येथील रुग्णाची मोफत तपासणी करून त्यांच्यावर मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

रविवारी १० मार्च रोजी लायन्स क्लब ऑफ कोलाड- रोहा, लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग, अंशुल स्पेशालटी लिमिटेड धाटाव रोहा,डॉ गांधी यांच्या वतीने तसेच ग्रूप ग्राम पंचायत येरल व सुतारवाडी ग्रामस्थ महीला मंडळ यांच्या सहकार्याने येथील दत्त मंदीर सभागृह येथे मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू  शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते याला येथील रुग्णांनी भरभरुन प्रतिसाद देत सदरच्या शिबिरात सत्तरहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली तर १० रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.दरम्यान तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केली जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे.

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले, उपाध्यक्ष डॉ मंगेश सानप, सेक्रेटरी अनिल महाडिक, खजिनदार नंदकुमार कळमकर,सरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच दत्ताराम मंचेकर, नथूराम साळवी गाव कमिटी अध्यक्ष, समृध्दी साळवी ग्राम पंचायत सदस्य ,राजाराम किर्जत, विजय सावंत, चिंतामणी दळवी, संदीप चिविलकर, पत्रकार हरिश्चंद्र महाडीक लायन डॉ श्याम भाऊ लोखंडे, विश्र्वास निकम, दिनकर सानप,रविंद्र लोखंडे, राजेन्द्रर कोप्पू,तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन येथून तपानिस आलेले डॉ प्रतीक कणासे, हर्षद गोळे, कमलाकर काका, प्रतीक, तसेच लॅब टेक्निशियन सुमिता सह लायन मेंबर्स आदी तपासणीसाठी आलेले रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ श्याम लोखंडे यांनी केले तर प्रास्तविक मार्गदर्शन क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन केले तसेच माजी सरपंच दत्ताराम मंचेकर यांनी लायन्स क्लबच्या कामाचे कौतुक करत मार्गदर्शन करत सहभागी संस्थेचे आभार मानले.तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी सुतारवाडी ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले.



Comments

Popular posts from this blog