माणगांवात बनावट कागदपत्रे व तोतया महिला उभी करून जागेची विक्री

तब्बल ७६ लाखांची फसवणूक

माणगांव : प्रतिनिधी :- माणगांवात बनावट कागदपत्रे बनवून व तोतया महिला उभी करून जागेची विक्री करून तब्बल ७६ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, स्टेला विल्यम डिसुझा, वय ७४ वर्षे, रा. बी/४३,१७२, स्टेल्ला मारीस, विद्यानगरी मार्ग, सुंदरनगर, म्युनिसिपल स्कूलजवळ, कलिना, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई यांनी दिलेल्या खबर नुसार मौजे कुशेडे तर्फे तळे, ता. माणगांव, येथे त्यांच्या  मालकी वहीवाटीच्या गट नं १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५ अ, १७६, १७७, १७८, १८०, १८१ व १८३ या मिळकती असून सन १९८९ साली त्यांनी खरेदी केलेल्या होत्या. तेव्हा पासून त्यांच्या मालकीच्या आहेत.  ते व त्यांचे कुटुंब कामानिमित्त मुंबई येथे राहतात.  मौजे कुशेडे तर्फे तळे येथील वरील नमूद जागेच्या ठिकाणी  अधूनमधून ते येत जात असतात. जानेवारी महिन्यामध्ये एक दिवस त्यांनी त्यांच्या जागेचे ७/१२ उतारे ऑनलाईनपध्दतीने काढले असता, ७/१२ वर त्यांच्या ऐवजी इतर नावे असलेली  दिसून आली. त्यावर खात्री  करण्यासाठी ते फेब्रुवारी २०२४ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालय, माणगांव येथे जावून जागेबाबत चौकशी केली व सदर कार्यालयामधून कागदपत्राची मागणी करून कागदपत्रे पाहीली असता,  कागदपत्रांवरुन त्यांना असे दिसले की, दि. १८ जुलै २०२३ रोजी त्यांच्या मालकी जमिनी  परस्पर सुशिल बळीराम शिंदे, रा. मु. उमरोली, पो. खरवली, ता. माणगांव,  व अझरुद्दीन सय्यद कुरुक्कर, रा. भानंग, ता. तळा,  यांनी अखत्यारपत्र दस्त क्र. २०४६/२०२३ असे स्वतःचे नावे करुन घेतल्याचे दिसून आले.  त्या अखत्यारपत्रावर त्यांचा फोटो, सह्या किंवा अंगठा नाही.  अखत्यारपत्र बनवताना कोणीतरी तोतया स्त्री त्यांच्या नावाने उभी करुन,  खोट्या सह्या करुन,  बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून ते अखत्यारपत्रास जोडून सदरचे अखत्यारपत्र वरील दोघांनी स्वतःचे नावे करुन घेतले असल्याचे दिसून आले.

 स्टेला डिसुझा यांच्या मालकीची वहीवाट व  नावे ७/१२ असलेले मौजे कुशेडे तर्फे तळे, ता. माणगांव येथील गट नं. १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५ अ, १७६, १७७, १७८, १८०, १८१ व १८३ मधील एकूण १७-९५- ०० क्षेत्र (१७-९५ हेक्टर) मिळकतींचा  परस्पर व समंतीशिवाय त्यांच्या  नावाचे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी बनावट कागदपत्रे तयार करुन, तसेच कोणीतरी अज्ञात महिला  उभी करुन, अखत्यारपत्र व खरेदी दस्तांवर खोट्या सह्या करुन, बँकेत  नावाने खाते काढून, मिळकतीचे अखत्यारपत्र व खरेदीखत दस्त दुय्यम निबंधक कार्यालय, माणगांव येथे बनवून, त्याचे मोबदल्यात रक्कम रुपये ५,५५,०००/- रोख स्वरुपात व रक्कम रुपये ७०,३२,०००/- चेक स्वरुपात रक्कम घेवून आरोपी सुशिल बळीराम शिंदे, रा. मु. उमरोली, पो. खरवली, ता. माणगांव,  २) अझरुद्दीन सय्यद कुरुक्कर, रा. भानंग, ता. तळा ३) सिराजउद्दीन म. अली जोगिलकर, रा. गाव मोहन खामगाव, ता. म्हसळा,  व ४) किरण बळीराम शिंदे,  यांनी त्यांची फसवणूक केली आहे.

  सदर प्रकरणाबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog