ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांब मधील १४  विद्यार्थ्यांना राज्यपुरस्कार प्रदान, विविध स्थरावरून विद्यार्थ्यांचे अभिनंदन 

कोलाड (विश्वास निकम,रायगड भूषण) :- ८ जानेवारी २०२४ ते दि.११ जानेवारी २०२४ रोजी या कालावधीत राज्यपूरस्कारासाठी दादर मुंबई येथे ४ दिवस परीक्षा शिबीर घेण्यात आले.या परीक्षा शिबिरात रोहा तालुक्यातील खांब येथील ज्ञानांकुर इंग्लिश मेडीयम स्कूल खांबच्या १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या सर्वच विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा अप्रतिम ठरल्या या परीक्षेच्या जोरावर सर्व विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दादर मुंबई येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत स्काऊट/गाईड प्रार्थना,नियम,वचन,गाठीचे प्रकार, स्काऊट गाईडचा इतिहास,अंदाज लावणे वस्तूची लांबी,रुंदी,उंची,व्यायामाचे प्रकार, लेखी परीक्षा,लॉगबुक,फाईल तपासणी,स्वच्छता,टेन्ट सजावट,या सारख्या गोष्टीची परीक्षा घेण्यात आली.या राज्य पूरस्कारासाठी रायगड, ठाणे, पालघर, जिल्ह्यातील २०० वर स्काईड व गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते 

यावेळी रायगड जिल्ह्यातील स्काईड गाईड पदाधिकारी राठोड मॅडम, संतोष दाते सर, लीडर ट्रेनर प्रशांत गायकवाड सर, वर्षा दळवी मॅडम,दत्तात्रय कदम सर,प्रशांत भगत सर,रुपेश गमरे सर, तसेच रविंद्र लोखंडे सर,गाईडर स्नेहा मोहिते मॅडम,जयश्री मोहिते मॅडम,मुख्यध्यापिका रिया लोखंडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सोहम तुपकर,जय डवले,सुरज पवार,विघ्नेश महाडिक,साहिल गोळे,शेजल शेडगे,आर्या लोखंडे,साक्षी मोहिते,अक्षरा मरवडे,कनिका कचरे,मधुरा कोस्तेकर,श्रुती वाटवे,संस्कृती चितळकर, श्रेया भोसले,या ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब च्या १४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता व विशेष म्हणजे सर्वच विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व त्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या राज्य पुरस्कारा बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे विविध स्थरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog