
इंडो स्काॅट्स ग्लोबल स्कूल तर्फे आरोग्य जनजागृती ठाणे! मुलुंड : सतिश पाटील :- इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या वतीने तलावपाळी येथे आरोग्य जनजागृतीसाठी वॉकाथॉन ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शाळेचे विद्यार्थी व पालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये स्वास्थ्याची जाणीव निर्माण करणे आणि स्थूल जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा होता. शाळेच्या प्राचार्या डॉ. निकिता व्ही. कोठारी यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमात सर्व सहभागींसाठी वॉकानंतर सौम्य वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रातील आरोग्य तज्ज्ञांनी मार्गदर्शनपर व्याख्याने दिली. डॉ. अपर्णा चव्हाण (कार्डिओरेस्पिरेटरी फिजिओथेरपिस्ट) यांनी श्वसन आरोग्य व हृदयाचे आरोग्य कसे जपावे यावर मार्गदर्शन केले. सुप्रिया केदार (पॅथॉलॉजिस्ट) यांनी नियमित आरोग्य तपासण्यांचे महत्त्व स्पष्ट केले. अनुराधा जोशी (न्युट्रिशनिस्ट व फार्मासिस्ट) यांनी संतुलित आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमात पालक व व...