Posts

Showing posts from July, 2025
Image
  खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय बँगचे वाटप. तळा : नझीर पठाण :- खासदार सुनिल तटकरे यांचा १०जुलै जन्म दिन असून पुर्व संधेला पिटसई  ल.लोखंडे हायस्कूल व तळा उर्दू हायस्कूल येथे शालेय दफ्तर(स्कूलबँग)वाटप मंगळवार दि.८जुलै रोजी  करण्यात आले. यावेळी तन्वीर पल्लवकर, आयशा पल्लवकर एँड.उत्तम जाधव माजी महिला बालकल्याण सभापती जि.प.गिताताई जाधव,तालुका महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,जगदिश शिंदे, चरईसरपंच प्रवीण आंबार्लै, गिरणे उपसरपंच,नागेश लोखंडे,उर्दु हायस्कूल चे मुख्याध्यापक लोखंडे सर सह शिक्षक व पिटसई हायस्कूल चेअरमन खेळु वाजे,सदस्य मनोहर गायकवाड मुख्याध्यापक खुळपे सर,सह शिक्षक शिक्षीका विद्यार्थी उपस्थित होते. खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमाने साजरा केला जातो.तळा येथे वाढदिवसाचे औचित्यसाधून पाककला कृती स्पर्धाचे आयोजन दि.१२जुलै२५रोजी केले आहे. या मधून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन वेगवेगळी कला दाखवण्याची संधी मिळते व आकर्षक बक्षीसे देऊन मनोबल वाढविण्यासाठी मदत होते.रायगडात खासदार तटकरे साहेबांचा वाढदिवस म्हणजे अबालापासून जेष्ठ नागरिक...
Image
  आईबाबा प्रतिष्ठान तर्फे वह्या व शालेय वस्तू वाटप !  मुबंई : (सतिश पाटील) :- मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो हा मूलमंत्र लक्षात घेता, गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या मिळाव्यात, या दृ ष्टीकोनातून ॐ श्री स्वामी उदयानंदगिरी पंचमुखी शिवमंदिर आणि आई बाबा प्रतिष्ठान तर्फे  "मोफत वह्या वाटप" हा अभिनव उपक्रम  राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पंचमुखी शिव मंदिराचे विश्वस्त श्री. अनिल विठोबा वैती आणि  श्री. महेंद्र विठोबा वैती यांच्या शुभ हस्ते मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम नवघर कोळीवाडा, मुलुंड पूर्व येथे संपन्न झाला. शैक्षणिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हि अनिल विठोबा वैती  यांची कृतज्ञता कौतुकास्पद असून, मोफत वह्या व शालेय वस्तू वाटप या अभिनव उपक्रमाचे सौ. अंकित निमा यांनी कौतुक केले. दरम्यान शहरातील सर्व भागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे अनिल विठोबा वैती  यांनी या वेळी सांगितले. या वह्या वाटप कार्यक्रमासाठी  विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Image
  छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पळसधरी येथे वृक्षारोपण राजमाता जिजाऊ फाउंडेशनतर्फे पर्यावरण संवर्धनाचा स्तुत्य उपक्रम पळसधरी (कर्जत) पंकेश जाधव :  दिनांक 26 जून 2025 रोजी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने पळसधरी येथे वृक्षारोपणाचा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक न्याय, समता आणि पर्यावरण संवर्धनाचे भान जपत फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन "झाडे लावा, झाडे जगवा" या प्रेरणादायी घोषवाक्यासह नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली. या उपक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. पूजा प्रताप सुर्वे यांच्यासह सौ. सुवर्णा सुर्वे, दिव्यांशू सुर्वे, कांचन देशमुख, पल्लवी कनोजे, सूरज वाघमारे, मनीषा पवार, शंतनू सुर्वे तसेच परिसरातील महिला, युवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी विविध प्रकारच्या देशी झाडांचे रोपण करून निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे आयोजन करताना शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून प...